शिंदेंच्या आमदारांचा खळबळजनक दावा : नेत्याचा हात असेल !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २३ ऑक्टोबर २०२३ | ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेक धागेदोरे समोर येत आहे. सध्या राज्यातील पोलीस अँक्शन मोडवर आले असून मुंबई, पुणे, नाशिकसह छत्रपती संभाजीनगर येथे छापेमारी करत पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं आहे. या प्रकरणात आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

- Advertisement -

राज्यातील ड्रग्ज प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. या प्रकरणात अनेक आमदार तसेच खासदारांचा समावेश असण्याची शक्यता आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. ड्रग्ज प्रकरणात कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा हात असेल, तर त्याला तातडीने जेलमध्ये टाका अशी मागणी सुद्धा शिरसाट यांनी केली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील ड्रग्ज प्रकरणावर भाष्य केलं. सरकारने ड्रग्स प्रकरण गांभीर्याने घ्यावे. यामध्ये राज्यातील आमदार-खासदार सहभागी आहेत, असा दावा शिरसाट यांनी केला.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS