खळबळजनक : भुसावळात माहिती अधिकारी कार्यकर्त्याचा खून

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २५ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील अनेक जिल्ह्यात खुनाच्या घटना घडत असतांना आता भुसावळ शहरातील गुन्हेगारी देखील पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. दसऱ्याच्या मध्यरात्री एका माहिती अधिकार कार्यकर्त्याचा खून झाल्याची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले होते.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील गरूड प्लॉट परिसरात दोस्ती मंडळाच्या जवळ दि.२४ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दिलीप जोनवाल यांच्यावर अज्ञात मारेकर्‍यांनी प्राणघातक हल्ला केल्याने यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. नवरात्रीचा शेवटचा दिवस असल्याने पोलीस प्रशासनावर आधीच बंदोबस्तावर असतांना रात्री झालेल्या या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

शहरातील मध्यवर्ती परिसरात दिलीप जोनवाल ( वय ४९, रा. महात्मा फुले नगर, भुसावळ ) यांचा खून झाल्यामुळे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. रात्री उशीरापर्यंत या संदर्भात शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या कृत्याला पूर्व वैमनस्याची जोड असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे फिरवली आहेत. तर मयत दिलीप जोनवाल हे माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS