back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

Seth Action Municipal ; सेठ कारवाईच्या टप्प्यात, मनपात हालचालींना वेग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Seth Action Municipal ; साक्षीदार न्यूज | २० फेब्रुवारी २०२४ | जळगाव मनपातील नगररचना विभागाचा भोंगळ कारभार आणि सेठचा चव्हाट्यावर आल्यावर मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड ह्या ॲक्शन मोडवर आल्या होत्या. त्या अनुशंघाने मनपा आयुक्तांनी नगररचना विभागात मोठे फेरबदल करीत स्वतः त्याकडे लक्ष वेधले होते. दरम्यान, मनपात वादग्रस्त ठरलेल्या सेठला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नव्हे तर सेठला ब्लॅक लिस्ट करण्याची देखील तयारी सुरू असल्याचे समजते.

- Advertisement -

जळगाव शहरात बेसमेंट पार्किंगचा मुद्दा अनेक वर्षापासून गाजत आहे. अनेक लोकप्रतिनिधी आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी तक्रार करून देखील त्यावर आजवर कोणतीही कारवाई झालेली नाही. काही दिवसांपूर्वी मनपात प्रशासक राज आल्यानंतर त्यांनी नेहरू पुतळा ते टॉवर चौक यादरम्यान पाहणी केली होती. अनेक इमारतींच्या तळघरात पार्किंग मंजूर करण्यात आलेली आहे. मात्र, प्रत्यक्ष जागेवर तळघराचा वापर मंजूर नकाशानुसार पार्किंगकरिता होत नसल्याचे निदर्शनास आल्याने काही दुकाने सील करण्यात आली होती. काही दुकानदारांनी पार्किंगसाठी बेसमेंटमध्ये काहीसा बदल करीत वेळ मारून नेली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दुकानाच्या प्रकरणात इमारतीच्या मालकाने या वादग्रस्त सेठची वास्तुविशारद म्हणून नेमणूक केली आहे. इमारतीच्या तळघरात मंजूर प्लॅननुसार पार्किंगकरिता वापर करणे अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्ष जागेवर तळघराचा वापर पार्किंगसाठी होत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने १ डिसेंबर २०२३ अन्वये तळघराचा वापर पार्किंगकरिता करण्याबाबत सूचित केले होते. तद्नंतरसुध्दा प्रत्यक्ष जागेवर तळघराचा वापर पार्किंगकरिता न केल्याने मनपा आयुक्तांनी हे दुकान सील केले होते.

- Advertisement -

कारवाईच्या अनुषंगाने दुकान मालकाने सील उघडण्याबाबत मनपाकडे अर्ज सादर केला. त्यासोबत १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर हमीपत्र दिले आहे. या हमीपत्रात ग्राहकांच्या पार्किंगकरिता सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात येईल. तळघराचा वापर पार्किंगसाठी करण्यात येईल, असे नमूद केले आहे. तसेच ११ जानेवारी २०२४ रोजी सुधारित नकाशा मंजुरीस्तव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावात दर्शविल्यानुसार प्रत्यक्ष जागेवर वाहनतळ प्रस्तावित करण्याच्या अटीवर १२ जानेवारी रोजी दुकानाचे सील उघडण्यात आले आहे. या दुकानदाराचे वास्तूविशारद असल्याच्या कारणाने प्रस्तावित बदल करून घेणे ही जबाबदारी असतानाही ती अद्याप केलेली नाही. त्यामुळे आपल्याविरूध्द नियमानुसार कारवाई का करण्यात येऊ नये ? याबाबत मनपाने ७ दिवसांत खुलासा मागविला आहे.

सेठचा हस्तक्षेप आहे कि नाही हे तपासणार कसे ?
जळगाव मनपातील नगररचना विभागात सेठचा वाढता हस्तक्षेप समोर आल्यावर मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी लक्ष वेधत अनेक बदल आणि बदल्या केल्या होत्या. मनपातील नगररचनाचे सहायक संचालक दिगेश तायडे यांना देखील पदभार काढून घेण्यामागे देखील सेठचा हस्तक्षेप भोवल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, काही पुरावे संकलित करून सेठला ब्लॅकलिस्ट करण्याची शिफारस आयुक्तांकडून दिल्ली दरबारी केली जाणार असल्याची शक्यता आहे. मनपात असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता सेठचा हस्तक्षेप सहज लक्षात येऊ शकतो. तसेच काही अधिकाऱ्यांचे सिडीआर पाहिले तरीही सेठ आणि संबंधित अधिकारी कारवाईच्या टप्प्यात येतील. मनपा आयुक्त पुढे काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.

Seth Action Municipal

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Fadnavis Support Pawar, Thackeray | फडणवीसांचा पवार-ठाकरेंना फोन, राजकीय...

Fadnavis Support Pawar, Thackeray | साक्षीदार न्यूज | जगदीप धनकड यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी...

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

RECENT NEWS