Jalgaon School News जळगाव | साक्षीदार न्यूज | जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात बुधवार, दिनांक ११ फेब्रुवारी रोजी समर्थ रामदास स्वामी यांची जयंती अर्थात दास नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. सचिन देशपांडे सर, उपमुख्याध्यापक आदरणीय श्री. प्रशांत जगताप सर, ज्येष्ठ पर्यवेक्षक आदरणीय श्री. संजय वानखेडे सर, पर्यवेक्षिका आदरणीय सौ. रमा तारे मॅडम, ज्येष्ठ शिक्षिका सौ. मंगला भारुळे मॅडम, सौ. रोहिणी प्रचंड मॅडम, श्री. ए. डी. पाटील सर, श्रीमती योगिता तडवी मॅडम, श्रीमती संपदा तुंबडे मॅडम, सौ. संगीता पानट, सौ. रेवती किन्हीकर, सौ. स्मिता करे, श्री. मयूर पाटील, श्रीमती योगिता महाजन तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विद्येची देवता देवी सरस्वती आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मान्यवरांच्या स्वागतानंतर सौ. मंगला भारुळे व सौ. स्मिता करे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग गोष्टीरूपाने सांगितले. श्रीमती संपदा तुंबडे मॅडम यांनी “आरंभी वंदिन अयोध्येचा राजा” हा अभंग सादर केला. तसेच नैतिक मूल्यांचा संदेश देणारे मनाचे श्लोक श्रीमती संपदा छापेकर मॅडम व सौ. संगीता पानट यांनी विद्यार्थ्यांकडून पठण करून घेतले, तर सौ. सुनीता रोटे यांनी त्या श्लोकांचा अर्थ स्पष्ट केला.
मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे सर यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या शिकवणुकीतून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. उपमुख्याध्यापक श्री. प्रशांत जगताप सर यांनी सज्जनगड येथे नेलेल्या शालेय सहलीच्या आठवणी सांगत विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती योगिता तडवी व सौ. रोहिणी प्रचंड यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती योगिता महाजन व कुमारी तिषा नेहेते यांनी केले. यावेळी सौ. रेवती किन्हीकर यांनी उत्तम पुरुषाची लक्षणे सांगितली.
शाळेचे पदाधिकारी, मार्गदर्शक, इयत्ता पाचवी व नववीचे वर्गशिक्षक बंधू-भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने दास नवमीचा कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.







