“सेवा पंधरवाडा 2025 : वृक्षारोपण, ग्रामसभा व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग”
Maharajswam Abhiyan | साक्षीदार न्यूज | सेवा पंधरवाड्याचे उद्दिष्ट पारदर्शक, लोकाभिमुख व परिणामकारक प्रशासन जनतेपर्यंत पोहोचवणे हे असून, सेवा पंधरवाड्याचा कालावधी दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 02 ऑक्टोबर 2025 असा असणार आहे. या काळात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस (17 सप्टेंबर) तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (02 ऑक्टोबर) या दोन महनीय व्यक्तींचे स्मरण ठेवून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
दिनांक 17/09/2025 रोजी “सेवा पंधरवाडा” (दि. 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2025) या विशेष उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी तहसिल कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच मौजे चिखली येथेही वृक्षारोपण करण्यात आले.
मौजे एणगाव येथील ग्रामसभेस तहसिलदार, बोदवड यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. ग्रामसभेत महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सेवा, विविध योजना व कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विशेषतः गावातील पाणंद रस्त्यांबाबत माहिती सांगण्यात आली. या प्रक्रियेत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सहकार्य केले. सदर अभियान प्रभावी करण्यासाठी स्थानिक स्तरावरील लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक संस्था तसेच सर्व नागरिकांचा सक्रिय सहभाग होता.
उर्वरित ग्रामसभांना सर्व ग्राम महसूल अधिकारी, नायब तहसिलदार, पुरवठा निरीक्षक, पुरवठा निरीक्षण अधिकारी तसेच सहायक महसूल अधिकारी यांनी उपस्थित राहून नागरिकांना सेवा पंधरवाड्यातील उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले.