रोहिणी खडसे यांच्या प्रचारार्थ मुक्ताईनगर येथे उद्या शरदचंद्र पवार यांच्या सभेचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

मुक्ताईनगर (सुनील भोळे) :- मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ उद्या (दि.११) मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे

- Advertisement -

दुपारी. ३ वा. तालुका क्रिडा संकुल मैदान मुक्ताईनगर येथे महाविकास आघाडीतर्फे ही सभा आयोजित केली आहे. मुक्ताईनगर मतदार संघांत महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे या उमेदवार आहेत. २०१९ विधानसभा निवडणूकीत विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुरस्कृत करण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विजयासाठी मेहनत घेतली होती. परंतु निवडून आल्यावर आमदार पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडून शिवसेनेचा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले.

या घडामोडी दरम्यान ऑक्टोबर २०२१ मध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आता रोहिणी खडसे या पक्षाच्या उमेदवार आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गेल्या काळात मुक्ताईनगर येथील पक्षाच्या परिवार संवाद कार्यक्रमात रोहिणी खडसे यांचा पराभव आमच्यामुळे झाला असून, या निवडणुकीत पंधरा हजाराच्या मताधिक्याने रोहिणी खडसे यांना विजयी करू अशी घोषणा केली होती. पक्षानेसुद्धा रोहिणी खडसे यांना महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद दिले आहे.

- Advertisement -

मुक्ताईनगर मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावरून गेल्या निवडणुकीत या मतदारांनी चंद्रकांत पाटील यांना मतदान केले होते परंतु चंद्रकांत पाटील यांनी निवडून आल्यावर शरद पवार यांची साथ सोडून शिवसेनेचा झेंडा हाती घेतला होता. नंतर ते शिंदे गटात गेले ही बाब या मतदारांच्या जिव्हारी लागली असून, त्याचा फायदा निश्चितच रोहिणी खडसे यांना होईल अशी मतदारसंघात चर्चा आहे. उद्याच्या शरद पवार यांच्या सभेकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS