धरणगाव शहरातील शीख बांधवांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत प्रवेश…!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या नेतृत्वावर विश्वास

- Advertisement -

जळगाव (सुनिल भोळे) : – धरणगाव शहरातील शीख बांधवांनी गुरुनानक जयंतीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नुकताच प्रवेश केला.

 

- Advertisement -

याप्रसंगी शीख बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आजपर्यंत आम्ही आमच्या व्यथा अनेक लोकप्रतिनिधींना सांगितल्या, परंतु कोणीही त्याबाबत गांभीर्याने विचार केला नाही. आम्हाला विश्वास आहे की माजी मंत्री श्री देवकर आप्पा निवडून आल्यानंतर नक्कीच आमच्या समस्या सोडवतील व आमचा सर्वांगिण विकास करतील.

याप्रसंगी अजयसिंग टाक, विजयसिंग टाक, लालसिंग टाक, भजनसिंग सिकलकर, कन्हैय्यासिंग टाक, हिरासिंग टाक, बिरुसिंग सिकलकर, विक्रमसिंग सिकलकर, कर्तारसिंग जुन्नी आदी शीख बांधवांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धरणगाव शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील सर, गोपाल पाटील, भगवान शिंदे, अविनाश करोसिया, संजू चंडाले, जुनेद बागवान, विलास वाघमारे, बबलू चव्हाण, चेतन पाटील, भैय्या भालेराव, सम्राट धनगर, हिरामण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

RECENT NEWS