साक्षीदार | २८ ऑक्टोबर २०२३ | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच राज्यातील दौऱ्यावर असतांना त्यांनी सभे दरम्यान शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेनंतर आता राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. स्वतः शरद पवार यांनी मोदींना देखील उत्तर दिले आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील प्रतिक्रिया दिलीय.
शरद पवार म्हणाले की, २००४ ते २०१४ या काळा देशाच्या कृषीमंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे होती. २००४ ला देशात अन्नधान्याची टंचाई होती. शपथ घेतल्यानंतर मी कटू निर्णय घेतला तो म्हणजे अमेरीकेतीला गव्हाचा आयात करण्याचा, असं सांगत पवारांनी घेतलेल्या निर्णयांचा पाढाच वाचला.
त्यानंतर पवारांना उत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका विशिष्ट विषयासंदर्भात टीका केली होती. शरद पवारांना आणखी काही गोष्टी करता आल्या असत्या, पण त्यांनी त्या केल्या नाहीत. त्यांना ही टीका झोंबली आहे.. झोंबू द्या, जनतेला सगळं माहिती आहे. त्या सभेला एक लाखांपेक्षा जास्त लोक होते, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.