साक्षीदार | १८ ऑक्टोबर २०२३ | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात ठाकरे गटाला जोरदार धक्के देत असतांना नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता शरद पवारांनी मोठा धक्का दिला आहे. शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची उद्या शरद पवार यांच्या उपस्थितीत घरवापसी होणार असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल करत त्यांनी सर्वांची माफी देखील मागितली आहे.
शहापूर विधानसभेचे माजी आमदार व सद्या शिवसेना शिंदे गटाचे नेते पांडुरंग बरोरा आपल्या समर्थकासह लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांच्या निवास्थानी त्यांची भेट घेतली आहे.
राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारकी लढून 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश केलेल्या शहापूर विधानसभेचे माजी आमदार व शिवसेना शिंदे गटाचे नेते पांडुरंग बरोरा आपल्या समर्थकासह लवकरच शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी शरद पवार यांच्या निवास्थानी शरद पवार भेट घेतली होती. यानंतर त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल करत सर्वांची माफी मागितली आहे.