जिथे माणूस परिस्थितीसमोर हार मानतो, तिथे बिरदेव डोणे याने परिस्थितीला झुंज देत इतिहास घडवला…
साक्षीदार न्युज । बिरदेव सिध्दाप्पा डोणे । एका अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा. त्याचे वडील मेंढपाळ. लहानपणापासून त्याने गरिबीचा, उपासमारीचा आणि संघर्षाचा प्रत्यक्ष सामना केला. शालेय जीवनातही त्याचं लक्ष अभ्यासाकडे असायचं, पण पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला वडिलांसोबत मेंढ्या चाराव्या लागत. अनेकदा पुस्तकं एका हातात आणि काठी दुसऱ्या हातात असायची.
आणि आज, तोच बिरदेव “IPS” झाला आहे!
परिणाम जाहीर झाला तेव्हा त्याचे वडील आजारी होते, आणि तो स्वतः एका माळरानावर मेंढ्या चारत होता… पण त्याच्या डोळ्यात मात्र देशसेवेचं आणि यशाचं स्वप्न होतं.
त्याने कोणतीही खास सुविधा घेतली नाही, की मोठ्या कोचिंग क्लासेसचा आधार घेतला नाही… त्याचा विश्वास होता – मेहनतीवर, चिकाटीवर आणि आपल्या स्वप्नांवर!
आज बिरदेव डोणे हजारो तरुणांसाठी एक जीवंत प्रेरणा ठरतो आहे. ही केवळ त्याची यशोगाथा नाही, ही आहे प्रत्येक ग्रामीण, गरीब, परंतु महत्त्वाकांक्षा असलेल्या तरुणाची स्वप्नपूर्ती!