Shiv Jayanti Celebration Jalgaon जळगाव | साक्षीदार न्यूज | येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालयात गुरुवार, दिनांक 19/02/2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली. संपूर्ण विद्यालय परिसर शिवमय झाला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे सर, उपमुख्याध्यापक श्री. प्रशांत जगताप सर, पर्यवेक्षक श्री. संजय वानखेडे सर आणि पर्यवेक्षिका सौ. रमा तारे मॅडम यांच्या हस्ते सरस्वती पूजन व शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात झाली. सौ. पद्मजा जोशी आणि श्री. आनंद पाटील यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची प्रेरणादायी माहिती दिली. श्री. पांडूरंग सोनवणे यांनी “अमुचे दैवत छत्रपती” हे गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.
विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला. कनिष्का ठाकरे, जगदीश शिंपी, विनय पाटील, खुशी पाटील, प्रज्ज्वल साळुंखे, श्रद्धा पाटील, ईशा गवळी, प्रसाद जैन, निरंजन डांबरे, विवेक नाथजोगी, सचिन पंडीत, योगेश पाटील, केतन कपाटे या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाषण, कथा, पोवाडा आणि गीत सादर करत आपली शिवभक्ती व्यक्त केली.
कृष्णा ताम्बट, गौरव साबळे, कृष्णा शर्मा, कार्तिक राठोड, लोकेश घुगे, उदय भालेराव यांनी “युगत मांडली” हे समूहगीत सादर केले. यावेळी दुर्गेश सराफ यांनी संबळवर साथ देत कार्यक्रमाला रंगत आणली. तसेच लावण्या निंबाळकर या विद्यार्थीनीने “माय भवानी” या नृत्याविष्कारातून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे सर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना शिवरायांचे पराक्रम, नेतृत्वगुण आणि स्वराज्याची प्रेरणा अंगीकारण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. संगिता पानट यांनी तर आभार प्रदर्शन सौ. मनिषा पवार यांनी केले. सूत्रसंचालन कु. टिशा नेहेते या विद्यार्थीनीने केले.
दरम्यान, जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित प्रभात फेरीतही विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक श्री. आनंद पाटील व श्री. प्रणित येवले सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. श्रीकांत घुगे, सौ. स्मिता करे, श्री. योगेश सोनजे, सौ. यमिनी चौधरी, सौ. जागृती मोराणकर, श्री. पंकज महाले, श्रीमती संपदा तुंबडे यांनी सहकार्य केले.
शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यालयात उत्साह, शिस्त आणि देशभक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला.







