Haldi Kunku Program जळगाव | साक्षीदार न्यूज | जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालय येथे माता–पालक संघातर्फे संक्रांत सणानिमित्त हळदी-कुंकू व मातृप्रबोधन कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सनातन धर्म प्रसारक सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर उपस्थित होत्या. यांच्यासह संस्थेच्या मुख्य समन्वयिका सौ. पद्मजाताई अत्रे, समन्वयिका सौ. विजयालक्ष्मी परांजपे, सौ. रेवती शेंदुर्णीकर तसेच पर्यवेक्षिका सौ. रमा तारे यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते माता सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी व व्याख्याता सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी विद्यार्थ्यांच्या संस्कार घडणीत मातांची भूमिका या विषयावर एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून स्लाइड्स व व्हिडिओच्या सहाय्याने प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाला उपस्थित मातांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या समन्वयिका सौ. विजयालक्ष्मी परांजपे होत्या. मातृप्रबोधन कार्यक्रमास सुमारे २५० माता-पालक भगिनींची उपस्थिती लाभली. शाळेतील सर्व शिक्षिका भगिनींनीही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
कार्यक्रमात सौ. रोहिणी प्रचंड यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर सूत्रसंचालन सौ. मनीषा वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. योगिता गवलकर यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री संजय वानखेडे आणि पर्यवेक्षिका सौ. रमा तारे यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.
Haldi Kunku Program








