जागतिक महिला दिनी शेठ ला.ना.विद्यालयाने केला महिलांचा सन्मान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

महिलांनी स्वतःला ओळखून आपला सर्वांगीण विकास करून समाज विकासात प्रमुख भूमिका निभवावी :प्रा.डॉ.नूतन पाटील यांचे आवाहन

- Advertisement -

 

Women’s Day साक्षीदार न्यूज | 8 मार्च 2025 | जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना. सा.विद्यालयात शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

- Advertisement -

या कार्यक्रमाच्या सुरुवातीस आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले ,लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,देवी सरस्वती यांच्या प्रतिमेस प्रमुख अतिथी प्रा.डॉ.नूतन पाटील ,शिक्षण प्रसारक मंडळाच्या समन्वयीका सौ.विजयालक्ष्मी परांजपे,शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे,उपमुख्याध्यापक श्री संजय भारुळे, जेष्ठ पर्यवेक्षक श्री.प्रशांत जगताप,श्री.संजय वानखेडे यांच्या हस्ते माल्ल्यारपण करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.आनंद पाटील यांनी तर प्रमुख अतिथी यांचा परिचय श्री पांडुरंग सोनवणे यांनी करून दिला.या वेळेस प्रमुख अतिथींचे स्वागत पुष्पगुच्छ व लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावरील कादंबरी कर्मयोगिनी हे पुस्तक देऊन करण्यात आले.या प्रसंगी शालेय विद्यार्थी वेदिका चौधरी,कुमुद चव्हाण, सुगंधा धनगर, आराध्या अठवाल,योगिता वाणी,तेजल सोनवणे,मुस्तफा पिंजारी,जयेश लोहार,यांनी थोर समाजसुधारक आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,झाशीची राणी लक्ष्मीबाई,राजमाता जिजाऊ,कवयित्री बहिणाबाई चौधरी,पहिल्या महिला पोलीस आयुक्त किरण बेदी, यांच्या वेशभूषा करून त्यांच्या जीवन कार्याची माहिती दिली.यावेळेस प्रमुख अतिथी यांचे हस्ते शाळेतील 50 शिक्षिका व शिक्षकेतर महिला भगिनी यांचा सत्कार गुलाबपुष्प,भेटवस्तू(पर्स ) देऊन करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी प्रा.डॉ.नूतन पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींना मार्गदर्शन करतांना सांगितले की महिलांनी आपल्या स्वतःतील बलस्थाने ओळखून सर्वांगीण विकास करावा व समाज विकासात प्रमुख भूमिका निभविण्याचे आवाहन केले .

या प्रसंगी श्री.मयूर पाटील व श्रीमती संपदा छापेकर यांनी स्त्रीशक्ती वंदना गीत सादर केले.या वेळेस महिलांच्या वतीने सरकारबद्दल सौ.पद्मजा जोशी यांनी ऋण व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोमनाथ महाजन यांनी तर आभारप्रदर्शन श्री.जगदीश साळुंखे यांनी केले.वंदेमातरम ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Women’s Day

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS