Maharashtra Politics साक्षीदार न्युज ( सुनिल भोळे ) ; – विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री आणि मंत्रीपदावरुन महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात पेच निर्माण झालाय. विधानसभा निवडणुकीत महायुतीला न भुतो न भविष्य असे यश मिळाले आहे . महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याच्यानंतर मुख्यमंत्रिपद कुणाला मिळणार यावर चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्रिपद भाजपच घेणार आहे अशी चरचा सुरु झाली. आणि त्याबरोबर शिवसेनेकडून देखील मागणी करण्यात आली. पण मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाच ठाम आहे असे भाजपा कडून सांगण्यात येत आहे. भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाच्या ऐवजी एकनाथ शिंदेंना दोन ऑफर देण्यात आल्या आहे परंतु ह्या दोघेही ऑफर एकनाथ शिंदे यांनी धुडकावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाऐवजी शिंदेंना केंद्रात मंत्रिपद आणि राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर देण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी या दोनही ऑफर धुडकाऊन लावल्या आहेत . उपमुख्यमंत्रीपद आणि केंद्रातील मंत्रिपद एकनाथ शिंदे स्वत: घेणार नाहीत, असे देखील समजतेय.
शिंदेंना जर का मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, तर एकनाथ शिंदे राज्य मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहणार नसल्याचे देखील बोलले जात आहे . त्यांनी भाजपला तसा कळविल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे . एकनाथ शिंदे हे फक्त पक्षप्रमुख म्हणून काम बघणार असल्याचे समोर आले आहे . त्याशिवाय राज्यात कुणाला उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे यासाठी ते दोन नावं महायुतीला सुचविणार आहेत .
एकनाथ शिंदे पक्षप्रमुखाच्या भूमिकेत काम बघणार असल्याचे सूत्रांनी सांगितली आहे . त्याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी ज्या २ जणांची नावे देणार आहेत, त्यामध्ये एक मागासवर्गीय किंवा मराठा चेहरा असू शकतो, असेही सांगण्यात आलेय.
जर का मुख्यमंत्री नाही मिळाले तर गृह खात्यासाठी आग्रही
मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी भाजप तयार नाही. एकनाथ शिंदे कडून गृहमंत्रालयाची मागणी करण्यात आली आहे. त्याशिवाय चांगल्या खात्याचीही शिंदे गटाकडून मागणी करण्यात आली आहे . जर का मुख्यमंत्री नाही मिळाले तर गृहमंत्रालय मिळणार का ? अशी चर्चा देखील सुरु झाली आहे . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप हे चार महत्त्वाची खाती आपल्या स्वत:कडे ठेवणार आहे त्यापैकी गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल हे खाते भाजप स्वत:कडे ठेवणार असल्याचे समजतेय. आता सध्या अर्थ खाते हे सध्या अजित पवारांकडे आहे, आणि नगरविकास खाते हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.