Shirsala Gramsabha | शिरसाळा ग्रामपंचायतीत भोंगळ कारभार? नागरिकांचा संताप ; मूलभूत सुविधांचा बोजवारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Shirsala Gramsabha बोदवड | सुरेश कोळी | तालुक्यातील शिरसाळा (मारोती) हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे गाव मूलभूत सुविधांच्या अभावामुळे गंभीर समस्यांना सामोरे जात आहे. ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -
Shirsala Gramsabha
Shirsala Gramsabha

गावात ग्रामसभा बराच काळ न झाल्याने नागरिकांनी ग्रामसेवकांकडे आग्रह धरला. त्यानुसार दि. 28 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सभा बोलविण्यात आली. मात्र कोरम अभावी ग्रामसभा बरखास्त करण्यात आल्याचे समजते.

यावेळी सुज्ञ नागरिकांनी ग्रामसेवकांना अनेक मुद्द्यांवर सवालांचा वर्षाव केला. विशेषतः —

- Advertisement -
  • सार्वजनिक शौचालयावरील पाण्याच्या टाक्या अद्याप गायब, त्या कुठे आहेत याचा ठावठिकाणा नाही.
  • मागील सभेत ग्रामसेवकांनी दवंडी देऊन पाण्याच्या टाक्या नेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याची घोषणा केली होती. परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई नाही, तसेच टाक्यांचा शोध नाही.

गावात फुटलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्तीही करण्यात आलेली नाही, मात्र कागदोपत्री बिल टाकल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

Shirsala Gramsabha

याशिवाय गावातील गटारी तुडुंब भरून रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. गावाच्या प्रवेशद्वाराजवळ तर गटारीत रस्ता की रस्त्यात गटारी? असे भयाण दृश्य दिसून येते.

ग्रामपंचायतीने अनेक कामे न केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे; मात्र न केलेल्या कामांची बिलं काढण्यात आली, असे आरोप ग्रामस्थ करत आहेत. ग्रामसभा कागदोपत्री दाखवणे आणि दुसऱ्या कार्यक्रमांचे फोटो अपलोड करून दिशाभूल केल्याचीही चर्चा आहे.

या सर्व प्रकारामुळे ग्रामपंचायतीविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

Shirsala Gramsabha

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS