जळगाव ( सुनिल भोळे ) : – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव शहर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख म्हणून शिवसेना उमनेते व संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी सुत्रे हाती घेतली आहेत. ते सलग पंधरा दिवस शहरात मुक्काम करणार असून प्रचाराचे नियोजन आदी बाबी हाताळणार आहेत.
- Advertisement -
आम्ही जळगाव शहराची जागा हमखास जिंकणार आहोत. माननीय उद्धवसाहेब ठाकरे, शरद पवार साहेब व काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी शहरात एकजीनसीपणाने काम करीत आहे. या निवडणुकीत परिवर्तनाची संधी जनतेला उपलब्ध झाली आहे, असे श्री सावंत यावेळी म्हणाले. या घोषणेमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
- Advertisement -