back to top
गुरूवार, जून 12, 2025

Shiv Sena ; संतोष चौधरींच्या मनधरणीसाठी शिवसेनेचा पुढाकार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

संतोष चौधरींची संजय सावंत समजूत काढणार

जळगाव, दि.१७ (Sakashidar News) ; – रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडून उमेदवारी नाकारल्याने माजी आ.संतोष चौधरी नाराज आहेत. चौधरी यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे. चौधरींच्या भूमिकेनंतर महाआघाडीतील घटकपक्ष शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट मध्यस्थी करणार आहे. शिवसेना आणि संतोष चौधरी यांचे जुने संबंध लक्षात घेता ही समजूत काढली जाणार आहे.

- Advertisement -

👉🏻 हे हि बघाल ; रक्षाताई आणि स्मिता ताईला मत द्यायचे नाही तर मत…

भुसावळ येथील माजी आमदार संतोष चौधरी यांचे नाव रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडून जवळपास निश्चित झाले होते. मात्र ऐनवेळी भाजपतील आयात उमेदवार श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. नाराज संतोष चौधरी यांनी भुसावळ शहरात निर्धार मेळावा घेत कार्यकर्त्यांशी चर्चा करून दि.२४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले. शरद पवार यांना सांगून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे चौधरी यांनी सांगताना शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची देखील त्यांनी आठवण काढली.

स्व.बाळासाहेब ठाकरेंची ‘ती’ आठवण
भुसावळ येथे शिवसेना उमेदवाराच्या प्रचार सभेला आले असता तिथेच स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी त्याची उमेदवारी रद्द करून दुसऱ्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे, अशी आठवण संतोष चौधरी यांनी करून दिली. तसेच सध्या शरद पवार यांच्याकडून तीच अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. संतोष चौधरी सध्या दिल्ली आणि मुंबई येथे जाणार असून त्यानंतर भुसावळ शहरात येणार आहे.

- Advertisement -

शिवसेनेशी चौधरी बंधूंचे जुने नाते
माजी आ.संतोष चौधरी आणि अनिल चौधरी यांची राजकीय सुरुवात शिवसेनेतून झाली आहे. शिवसेना आणि चौधरी बंधूंचे जुने नाते आहे. आजही स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. शिवसेनेशी असलेले संबंध लक्षात घेता त्यांचे जुने मित्र पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत हे त्यांची समजूत काढणार आहे. श्रीराम पाटील यांना उमेदवारी का देण्यात आली, कोण – कोण स्पर्धेत होते, कोण कुठे मागे पडले हे सांगून संजय सावंत हे चौधरी बंधूंचे बंड शमविण्याचा प्रयत्न करणार आहेत.

Shiv Sena

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

mumbai pushpak express | मोठी बातमी: पुष्पक एक्स्प्रेस अपघात,...

mumbai pushpak express साक्षीदार न्युज |मुंबई, 9 जून 2025 | मध्य रेल्वेमार्गावर आज सकाळी एक भीषण रेल्वे अपघात घडला. कसारा येथे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमधून...

Girish Mahajan | फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने दिलासा, मागील काळ...

Girish Mahajan साक्षीदार न्युज | जळगाव, ७ जून २०२५ | राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात आयोजित भाजप कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मागील अडीच...

Jalgaon Charmakar Sangh | जळगाव जिल्हा चर्मकार संघाची नवीन...

Jalgaon Charmakar Sangh साक्षीदार न्युज  | जळगाव, ७ जून २०२५ | जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघाची सहविचार सभा व नवीन कार्यकारिणी निवड तसेच सेवानिवृत्त...

RECENT NEWS