शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांचा पद्मालय येथे प्रचार दौऱ्याचा झाला शुभारंभ !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

वाजत – गाजत आले महायुतीच्या पदाधिकारी

- Advertisement -

जळगाव / धरणगाव ( साक्षीदार न्युज ) दि. 27 ; – शिवसेना , भाजपा अजितदादा गट राष्ट्रवादी व रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव पाटील यांचा प्रचारचा शुभारंभ आज 27 ऑक्टोबर 2024 सकाळी 7.30 वाजता पवित्र आणि ऐतिहासिक अश्या श्री क्षेत्र पद्मालय येथे होत आहे. जिथे श्रद्धा आणि विकासाचे संकल्प सिद्ध होणार आहेत. यावेळी महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील व पदाधिकारी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून प्रचाराचा नारळ वाढवून म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गटात प्रचार करणार असून. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, ना.गिरीश महाजन, ना. अनिल पाटील, खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. प्रमुख ज्ञानेश्वर जळकेकर महाराज , अजित पवार गट राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेना जिल्हध्यक्ष निलेश पाटील, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, भाजप महिला आघाडी जिल्हाप्रमुख संगीताताई गवळी, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सरिताताई कोल्हे, राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाप्रमुख कल्पनाताई पाटील उपस्थित राहणार असून यावेळी मतदारसंघातील तिन्ही पक्षांचे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी 7.30 वाजता पद्मालय येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख शेखर अत्तरदे , रॉ.कॉ. चे रमेशबापू पाटील व सेनेचे संजय पाटील सर, भाजपाचे सरचिटणीस डी. जी. पाटील, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, रवी कापडणे, अनिल भोळे ,भाजप तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, जिजाबराव पाटील, शिवसेना तालुका प्रमुख शिवराज पाटील, डी.ओ.पाटील , राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भूषण पाटील, श्याम पाटील, धरणगाव व नशिराबाद शहर प्रमुख विलास महाजन, विकास धनगर तसेच भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – रिपाई महायुतीतर्फे करण्यात आले आहे.

प्रचार दौरा : म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गट
श्री क्षेत्र पद्मालय येथे सकाळी 7:30 वा. नारळ वाढविण्याचा शुभारंभ करण्यात आला. म्हसावद स. 9:00 वा – बोरणार, स .11:00 वा – लमांजन, दुपारी 12:30 व – कुऱ्हाळदे, दुपारी 1:00 वा प्रचार सुरू राहील त्यानंतर वावडदा येथे दुपारी 1:30 ते 2:00 वाजेपर्यंत विश्रांती राहणार असून बिलवाडी येथे दुपारी 3:30 वा, डोमगाव – सायंकाळी 4:30 वा, बिलखेडा- सायंकाळी 5:30 वा. त्यानंतर वावडदा येथे सायंकाळी 6:00 वा. प्रचाराला सुरुवात होणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS