Music Award Pune पुणे | साक्षीदार न्यूज | दैनिक साहित्य लीला पंढरी, पुणे यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल संगीतकार शिवराज साने यांना ‘उत्कृष्ट संगीतकार’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
रविवार, दि. 8 मार्च 2026 रोजी आयोजित या कार्यक्रमात कवी संमेलनासह विविध सांस्कृतिक उपक्रम पार पडले. विविध विषयांवरील कविता सादर करत साहित्यिकांनी रसिकांचे मनोरंजन केले. कला आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
उरुळी कांचन येथील साने संगीत क्लासेस व कला मंचचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या संगीतकार शिवराज साने यांनी संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ कवी चंद्रकांत दादा वानखेडे आणि सौ. पौर्णिमा वानखेडे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. हा कार्यक्रम ओक सभागृह, शनिवार पेठ, पुणे येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुशील सातपुते यांनी केले, तर कवी रंजीत पवार (जुन्नर) यांनी आभार प्रदर्शन केले.
या पुरस्कारामुळे संगीतकार शिवराज साने यांच्या कार्याचा गौरव झाला असून कला क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








