“मुलुख मैदान तोफ” गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वात शेकडो भीमसैनिकांनी बांधले शिवबंधन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

धरणगाव (सुनील भोळे ) ; – शिवसेनेचे नेतृत्व करणारे “मुलुख मैदान तोफ” गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वात आणि उपस्थितीत आसोदा येथील फुले, शाहू, आंबेडकर संस्थेचे पदाधिकारी व संस्थेचे सदस्यांसह शेकडो भीमसैनिकांनी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. असंख्य युवकांचे हृदय सम्राट आदरणीय गुलाबराव के पाटील यांच्या झुंजार नेतृत्वावर प्रचंड विश्वास ठेवून शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करीत आहोत महायुतीचे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी जिवाचे रान करू अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. तर भिमसैनिक आणि शिवसैनिकांचे ऐक्य अभिमानाची बाब असून आपली साथ विरोधकांच्या छाताड्यावर घणासारखा आदळणारा ठरेलअसे प्रतिपादन शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले. ते प्रवेश सोहळ्याप्रसंगी बोलत होते.*

- Advertisement -

आसोदा येथील फुले, शाहू , आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष व माजी उपसरपंच चंदनभाऊ बिऱ्हाडे यांचा आज शिंदे शिवसेनेत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. त्यांच्या सोबत संजय कासार, कैलास कुंभार, गणेश पाटील, लहाणू पाटील, जितेंद्र बिऱ्हाडे, गणेश बिऱ्हाडे, किशोर बिऱ्हाडे, मुकेश बिऱ्हाडे, गौतम बिऱ्हाडे, मंगल बिऱ्हाडे, बंटी सपकाळे, समाधान साळुंखे, विष्णू बिऱ्हाडे, नरेंद्र मरसाळे , योगेश मरसाळे, महेंद्र सपकाळे, गणेश पवार, संदीप बिऱ्हाडे, भुरा मरसाळे, दिपक मरसाळे, पवन मरसाळे, नितीन साळुंखे यांनीही शिव बंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी सभापती मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंदराव ननव्हरे , तुषार महाजन, अजय महाजन, नारायण आप्पा कोळी, मनोज चौधरी, आबा माळी, कैलास चौधरी, श्याम कोगटा आदी उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS