साक्षीदार | ३१ ऑक्टोबर २०२३ | मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या ७ दिवसापासून आंदोलन सुरु असतांना अनेक ठिकाणी हे आंदोलन हिसंक पद्धतीने सुरु झाले आहे. तर राजकीय नेत्यांना गावबंदी देखील केली असतांना आता दोन दिवसापासून राज्यातील आमदार व खासदार राजीनामा देत असल्याचे सत्र सुरु असतांना आता शिंदे गटाला एक मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे आमदाराने देखील राजीनामा दिला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा थेट विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला आहे. राज्यात सध्या मराठा समाजाचे आंदोलन पेटलेले असताना रमेश बोरणारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मतदार संघातूनच बोरणारे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर बोरणारे यांनी राजीनामा दिला आहे.