साक्षीदार | १९ ऑक्टोबर २०२३ | राज्यभरातील अनेक अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे हि घटना पुणे शहरातील कोंढवा परिसरात घडली आहे. भाच्याचा वाढदिवस असल्याचे सांगून एका महिलेला कोंढवा परिसरात नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. एवढे नाही तर तिचे न्युड फोटो मित्राला दाखवून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी कोंढवा येथील दोघांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार ऑगस्ट 2010 ते ऑगस्ट 2023 दरम्यान घडला आहे. याबाबत बिबवेवाडी येथे राहणाऱ्या 29 वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार कलीम सलीम शेख (वय-45) आणि आश्रफ शेख (वय-25) यांच्यावर आयपीसी 376/2/एन, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कलीम शेख याने ओळखीच्या असलेल्या फिर्यादी महिलेला भाच्याचा वाढदिवस असल्याचे सांगून कोंढवा येथे घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने महिलेसोबत बळाचा वापर करुन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे महिलेने याबाबत वाच्चता केली नाही. दरम्यान, फिर्य़ादी घरी असताना आरोपी कलीम शेख हा घरी आला. त्याने फिर्यादी यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांचे मोबाईल मध्ये असलेले न्युड फोटो मित्र आश्रफ शेख याला दाखवून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.