जळगाव ; – आठ वर्षाची चिमुकलीचा विनयभंग करत तिला पळवून नेण्याच्या उद्देशाने उचलून नेत असल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला. सुदैवाने पिडीत मुलीच्या आईच्या लक्षात हा प्रकार आल्याने संशयितांने मुलीला सोडून पसार झाला. याप्रकरणी बुधवारी रात्री जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. राजेंद्र छन्नु कोळी रा. ममुराबाद ता.जि.जळगाव असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
👉🏾 क्लिक करा ; – तहसीलदार बनले कॉलेज कुमार ; वाळू चे १६ ट्रॅक्टर पकडले
विश्वसनिय पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावातील एका भागात ३४ वर्षीय महिला आपल्या आठ वर्षाच्या मुलीसोबत वास्तव्याला आहे. सोमवारी १ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी राजेंद्र कोळी हा महिलेच्या घरी आला. त्यावेळी वाईट उद्देशाने मुलीचा विनयभंग करत तिला उचलून पळवून नेत असतांना पिडीत मुलीच्या आईने त्याला पकडले. या झटापटीत त्यांनी मुलीसा सोडून पसार झाला होता. पिडीत मुलीसह तिच्या आईने जळगाव तालुका पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी १ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता संशयित आरोपी राजेंद्र कोळी याच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.