आपल्या कानावर दररोज अनेक वाईट घटना ह्या ऐकण्यास मिळत असतात . अनेक ठिकाणी नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना देखील एकत असतो . बाप लेकीचे नाते हे पवित्र असे नाते असते पंरतु अनेक असे नराधम आहेत कि ते ह्या नात्याला देखील काळिमा फासण्याचे काम करीत आहे.
अशीच एक घटना घडली आहे मुंबईतील गोवंडी पूर्व उपनगरात आपल्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर दोन वर्षा पासून अत्याचार हा नराधम करीत होता ह्या घटने बद्दल कुणालाही जर का सांगितले तुला जीवे ठार मारण्याची धमकी आल्या मूलीला देत होता . ह्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. मुलीच्या आईने घडलेल्या घटनेबद्दल पोलिसात फिर्याद दिल्यानंतर आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला,शिवाजी नगर पोलिसांनी सांगितले की, “आरोपी पित्याने गेल्या दोन वर्षांत आपल्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केला.याला न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .
प्रकरण कसे समोर आले ?
आपलं;इ मुलगी हि आईला रडतांना आढळल्यावर आईने तिची सर्व परिस्थिती विचारल्यानंतर ही घटना उघडकीस आली. “पण ती गप्प राहिली”, पोलिसांनी सांगितले. “आरोपींनी तिला या घटनेबद्दल कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती,” पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, तिच्या वडिलांनी तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आणि तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेले. हि सर्व घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पीडितेच्या आईने या प्रकरणाची तक्रार पोलिस ठाण्यात केली, ज्याच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला,