धक्कादायक : शौचालयाच्या टाकीत पडून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १४ नोव्हेबर २०२३ | अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथे सोमवार दि. १२ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शौचालयाच्या टाकीत पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात भूषण दिलीप सोनवणे (वय-२) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथील अशोक सोनवणे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने त्याठिकाणी शौचालयासाठी लागणारी टाकीचे बांधकाम करण्यात आले असून ही टाकी पुर्णपणे पाण्याने भरलेली होती. या टाकीजवळ खेळतांना भषण दिलीप सोनवणे (वय २ वर्ष) हा चिमुकला टाकीत पडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्या आजोबा लिलाधर गोविंदा सोनवणे यांना शौचालयाच्या टाकीत चिमुकला भूषण हा टाकीत मृतवस्थेत दिसून आला. त्याला बाहेर काढून तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS