back to top
गुरूवार, फेब्रुवारी 5, 2026

देवीची कृपा राहण्यासाठी नवरात्रोत्सव करा अशी खरेदी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | १२ ऑक्टोबर २०२३ | देशभर येत्या आठवड्यात शारदीय नवरात्रोत्सव सुरु होत आहे. यासाठी अनेक भाविकांनी मोठी तयारी देखील केली आहे. हा सन देवीला प्रसन्न करण्यासाठी देखील केला जात असतो. नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या वेळी 15 ऑक्टोबरपासून नवरात्रीचा उत्सव सुरू होत आहे. तो नऊ दिवस म्हणजे 23 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

- Advertisement -

नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये देवीची पूजा करण्याची परंपरा आपल्याला माहिती आहेच. या शिवाय, देवीशी संबंधित काही वस्तूंची खरेदी करून तुम्ही वर्षभर देवीचा आशीर्वाद मिळवू शकता. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदेल.

काशी येथील ज्योतिषी आणि प्रसिद्ध विद्वान स्वामी कन्हैया महाराज यांनी सांगितलं की, नवरात्रीच्या काळात कलश खरेदी करून घरी आणावा. कारण, कलश समृद्धीचं आणि वैभवाचं प्रतीक आहे. चांदी, पितळं, तांबं किंवा मातीचा कलश तुम्ही खरेदी करू शकता.

- Advertisement -

शत्रू होतील नाहीसे: नवरात्रात देवीच्या पावलांचं स्टिकर खरेदी करून ते देवघरात लावावं. असं केल्यास वर्षभर घरात देवीचा वास राहून शत्रू दूर होतील.

दुःख दूर होतील: देवीला कलावा(लाल-पिवळा सुती दोरा) खूप आवडतो. त्यामुळे शारदीय नवरात्रात कलावा विकत घेऊन देवीला अर्पण करावा. असं केल्यानं देवी सर्व दु:ख दूर करते, असं मानलं जातं.

संकटांपासून मुक्तता: या शिवाय नवरात्रामध्ये देवीची मूर्तीही घरी आणावी. मूर्ती लहान असो किंवा मोठी यानी काही फरक पडत नाही. घरात देवीची उपस्थिती राहिल्याने सर्व संकटं दूर होतात.

नारळ फोडल्यास दुःख दूर होतात: नवरात्राच्या काळात श्रीफळ म्हणजेच नारळ देवीला अर्पण करून तो फोडला पाहिजे. असं केल्याने जीवनातील सर्व संकटं दूर होतात आणि लक्ष्मीची कृपा होते.

नवरात्राच्या काळात घरात घटस्थापना करून देवीचा उपवास धरणंही चांगलं मानलं जातं. काहीजण संपूर्ण नऊ दिवस उपवास धरतात तर काहीजण सात, अडीच किंवा दीड दिवसांचा उपवास धरतात. काहीजण उठता-बसता म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास धरतात.

शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात, देवीच्या शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री या रुपांची पूजा केली जाते. गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये शारदीय नवरात्रौत्सव साजरा केला जातो. तर, उत्तर भारतामध्ये चैत्र महिन्यातील चैत्र नवरात्रौत्सव साजरा केला जातो.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sant Ravidas Jayanti | भडगावात जगतगुरू संत रविदास महाराज...

Sant Ravidas Jayanti भडगाव | गोरख माळी | राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भडगाव शहराच्या वतीने जगतगुरू संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात...

Jalgaon News | जळगावात बंद घर फोडून सोन्याची चोरी;...

Jalgaon News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरातील आयोध्या नगर परिसरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी...

Human Rights Association | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुपाली...

Human Rights Association अचलपूर | साक्षीदार न्यूज | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौं. रुपाली अभय माथने यांचा आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेलफेअर असोसिएशन, अचलपूर–परतवाडा यांच्या वतीने...

RECENT NEWS