Ujjwala Gas ; जळगावात उज्ज्वला गॅसच्या नावावर दुकानदारी ; चार जणाविरोधात गुन्हा !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २२ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील अनेक शहरातील हरिविठ्ठल नगर, आशाबाबा नगर, खंडेराव नगर, अयोध्या नगर, गोपाळपुरा, आसोदा रोड अशा परिसरातील नागरिकांना उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत एलपीजी गॅस कनेक्शन देण्याची बतावणी करीत प्रत्येक महिलेकडून कागदपत्रे, बाराशे महिलांकडून प्रत्येकी १५० रुपये असे एकूण एक लाख ८० हजार रुपये घेऊन चार जणांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील हरिविठ्ठल नगर, आशाबाबा नगर, खंडेराव नगर, अयोध्या नगर, गोपाळपुरा, आसोदा रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत एलपीजी गॅस कनेक्शन देण्याची बतावणी करीत तशा मजकुराचे बॅनर लावून स्टॉल लावण्यात आले. त्या ठिकाणी महिलांकडून रेशनकार्ड, आधारकार्ड, कागदपत्रांची झेरॉक्स व फोटो घेऊन प्रत्येक महिलेकडून १५० रुपये जमा केले. एकूण एक हजार २०० महिलांकडून ही रक्कम जमा करण्यात आली. २९ सप्टेंबर ते २० ऑक्टोबरपर्यंत चार जणांकडून ही दुकानदारी सुरू होती. अनेक दिवस झाले तरी कनेक्शन मिळत नसल्याने याविषयी महिलांनी विचारणा केली. मात्र, योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेंद्र सपकाळे यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रामेश्वर कॉलनी, सुप्रीम कॉलनी, भोलाणे, नवीन बी. जे. मार्केट या ठिकाणच्या विजय भोलाणे (६७), करण भोलाणे (३२) यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि चंद्रकांत धनके करीत आहेत

Ujjwala Gas

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS