back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

पाच वर्षांत कोणतीच योजना अस्तित्वात न आणणाऱ्या आमदारास जागा दाखवून द्या – माजी सरपंच कैलास माळी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बोदवड (सुनील भोळे) : – नाथाभाऊ यांच्या प्रयत्नाने बोदवड ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतरण झाले त्यामुळे शहर विकासाला नगरविकास खात्या मार्फत निधी मिळणे सोपे झाले. मुक्ताईनगर मतदारसंघाच्या उमेदवार ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांनी बोदवड शहरातील विविध प्रभागात आठवडे बाजार भागात ॲड.रविंद्र भैय्यासाहेब पाटील, उदयसिंह पाटील यांच्या उपस्थितीत जनआशिर्वाद पदयात्रा काढली होती. यावेळी ठिकठिकाणी बोदवडवासियांशी माजी सरपंच कैलास माळी हे संवाद साधत होते.

- Advertisement -

Former Sarpanch Kailas Mali
ते पुढे म्हणाले की, नाथाभाऊंच्या माध्यमातून शहरात अनेक विकास कामे झालीत शहराला पाणी पुरवठा करणारी ओडीए योजना झाली याउलट विद्यमान आमदारांनी गेले पाच वर्ष पाणी पुरवठा योजनेच्या नावाखाली नुसता वेळखाऊपणा केला.योजनेसाठी नुसत्या बैठकाच घेतल्या. कधी ओझरखेडा धरणावरून योजना मंजूर झाल्याचे सांगितले तर कधी तापी नदी वरून मंजूर झाल्याचे सांगितले परंतु पाच वर्षांत कोणतीच योजना अस्तित्वात आली नाही. एकीकडे पाणी पुरवठा मंत्र्यांच्या जवळचे असल्याचे सांगतात परंतु पाच वर्षात दिलेले आश्वासन पूर्ण करु शकले नाहीत. पाच वर्ष संपल्यावर पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्याचे सांगत आहेत. खरे खोटे देव जाणे म्हणून आता शहराच्या, मतदासंघांच्या विकासाला गती देण्यासाठी रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे कैलास माळी यांनी नागरिकांना आवाहन केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS