back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

केवळ आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या लोकप्रतिनिधीला त्याची जागा दाखवा – रोहिणी खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुक्ताईनगर (सुनिल भोळे) : – मुक्ताईनगर मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ ऐनपुर येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते , धाडस संघटना अध्यक्ष शरद कोळी यांची प्रचार सभा संपन्न झाली. अरूण दादा पाटील, विशाल महाराज खोले यांनी मनोगत व्यक्त करून रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

Rohini Khadse

यावेळी मतदारांशी संवाद साधताना उमेदवार ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या महायुतीचे सरकार हे महिलांना पंधराशे रूपये आणि शेतकऱ्यांना सन्मान निधीचे सहा हजार रूपये देउन मत विकत घेऊ पाहत आहे परंतु एकीकडे हे पैसे देत असताना दूसरीकडे खते बियाणे शेतीला लागणाऱ्या वस्तू, तेल साखर किराणा गॅस सिलेंडरची प्रचंड दरवाढ करून पैसे वसुल करणे सुरू आहे. शेतमालाला भाव नसल्याने वाढती महागाई आणि लागणारा खर्च बघता शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यातच नैसर्गिक आपत्ती ने शेतीचे नुकसान झाले आहे परंतु सरकारने शेतकऱ्यांकडे साफ दुर्लक्ष केले असुन कोणतीच नुकसान भरपाई किंवा विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपले लोक प्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहेत कोणतेच प्रश्न त्यांनी विधानसभेत मांडले नाही.

- Advertisement -

Rohini Khadse

स्वखर्चातून शेतरस्ते केल्याचे भासवून या रस्त्यांवर शासकीय निधी लाटला, सुलवाडी ते मेंढोळदे दरम्यान पुलाचे भूमिपूजन करून पुलाला नाबार्ड मधून मंजुरी आणि पन्नास कोटी निधी मिळाल्याचे सांगत आहेत परंतु प्रत्यक्षात या पुलाला ०४ अंतर्गत मंजुरी मिळाली असुन या हेडमध्ये निधी उपलब्धता नसते यातून निधी मिळून पुल पुर्ण व्हायला दहा पंधरा वर्ष लागतील नाबार्डमधून मंजूरीचा आमदारांनी पुरावा द्यावा जनतेची दिशाभूल करु नये गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात फक्त आश्वासनांची खैरात वाटली गेली त्यामुळे विकासाच्या बाबतीत मतदारसंघ मागे पडला.हे चित्र बदलवण्यासाठी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरील बटण दाबुन आपले मतदानरूपी आशिर्वाद देण्याची रोहिणी खडसे यांनी उपस्थितांना विनंती केली.

यावेळी माजी आमदार अरूण दादा पाटील, शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, विशाल महाराज खोले, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, माजी पं.स. सदस्य दिपक पाटिल,शिवसेना नेते मनोहर खैरनार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुका अध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश पाटील, पवनराजे पाटील, रामभाऊ पाटील, संजय पाटील, सचिन महाले, दत्ता पाटील, काशिनाथ पाटील, भगवान महाजन, अमोल महाजन, किशोर पाटील, अरविंद महाजन, सलमान खान, हैदर भाई , अक्षय महाजन, मोहन कचरे, पवन कपले, गणेश बाविस्कर, आत्माराम कोळी,निलेश पाटिल, गफुर कोळी, राजेंद्र कांडेलकर, नितिन पाटिल,मंदार पाटिल, मधुकर पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

CM Rekha Gupta Attacked | भाजपच्या मुख्यमंत्र्याच्या जनता दरबारात...

CM Rekha Gupta Attacked साक्षीदार न्यूज । आज, २० ऑगस्ट २०२५ रोजी जनता दरबारात एका ३५ वर्षीय तरुणाने हल्ला केला, ज्यामुळे राजधानीत खळबळ उडाली...

RECENT NEWS