साक्षीदार | २७ नोव्हेबर २०२३ | चित्रपट क्षेत्रात नेहमीच विविध कारणाने श्रद्धा कपूर चर्चेत येत असता नुकतेच श्रद्धा कपूरच्या एका व्हिडीओने सगळ्याचं लक्ष वेधलं. व्हायरल झालेल्या व्हिडीओत श्रद्धाला कसा जोडीदार हवा आहे हे सांगताना दिसत आहे. ‘
जेव्हाही मी लग्न करेन किंवा ज्या व्यक्तीशी मी लग्न करेन त्याच्यासमोर मी एकदम कोणतेही फिल्टर न ठेवता वागू शकली पाहिजे,’ असे ती म्हणाली. श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘तू झुठी मै मक्कार’ चित्रपटात रणबीर कपूरबरोबर तिने स्क्रीन शेअर केली होती. यातील तिची आणि रणबीर कपूरची जोडी खूपच पसंत केली गेली. शिवाय, राजकुमार रावसोबत ‘स्त्री २’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. अमर कौशिक यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटात अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.