Tabla Competition | श्रेयस सोनटक्के यांचा तबला वादनात राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Tabla Competition साक्षीदार न्युज |३ जून २०२५ | अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे यांच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, शिवाजीनगर, पुणे येथे २९ मे २०२५ रोजी आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत १२ वर्षीय श्रेयस रोशन सोनटक्के याने तबला वादनात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत त्याला उरुळी कांचन, पुणे येथील साने संगीत कला मंचाचे शिवराज साने यांनी हार्मोनियमवर उत्कृष्ट साथ दिली.

- Advertisement -

Tabla Competition

या स्पर्धेत नृत्य, संगीत, गायन, वादन आणि नाट्य अशा विविध कला प्रकारांचा समावेश होता. श्रेयस आणि शिवराज यांनी सादर केलेली तबला-हार्मोनियम जुगलबंदी इतकी प्रभावी होती की, त्यांनी परीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकली. श्रेयस यांना तबला वादनाचे मार्गदर्शन राजेंद्र नंदकुमार प्रभुणे यांनी केले.

- Advertisement -

कार्यक्रमाला स्नेहा पेटकर, वाघ सर आणि बुलबुल मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्रेयस यांच्या प्रतिभेचे सर्वांनी कौतुक केले. विशेष बाब म्हणजे, या यशानंतर श्रेयस यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील संगीत स्पर्धेसाठी थायलंड येथे निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tabla Competition

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

World Marathi Conference | विश्व मराठी संमेलनात जळगावच्या विद्यार्थिनींची...

World Marathi Conference जळगाव | साक्षीदार न्यूज | महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी आपल्या...

Chalisgaon Insurance Fraud | ५० लाखांच्या विमा दाव्यासाठी बनावट...

Chalisgaon Insurance Fraud चाळीसगाव | सुनिल भोळे | तालुक्यातील दहिवद फाट्यावर झालेल्या कथित अपघाती मृत्यू प्रकरणात धक्कादायक फसवणूक उघडकीस आली आहे. ५० लाख रुपयांच्या पर्सनल...

Music Award Pune | पुण्यात संगीतकार शिवराज साने यांचा...

Music Award Pune पुणे | साक्षीदार न्यूज | दैनिक साहित्य लीला पंढरी, पुणे यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला....

RECENT NEWS