जळगाव;- जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी येथील श्रीकृष्ण कॉलनीतील सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे भगवान महादेवाचे दर्शन घेतले. प्रसंगी प्रभागातील महिलांसह नागरिकांशी संवाद साधला.
- Advertisement -
सुरुवातीला आ. राजूमामा भोळे यांचे हस्ते महादेव मंदिरात आरती करण्यात आली. यावेळी स्मिता वाघ यांनी दर्शन घेतले. प्रसंगी नागरिकांशी संवाद साधून त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याबाबत आवाहन केले. प्रसंगी maaji महापौर सीमा भोळे, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, दीपमाला काळे, मंदिरातील जयेश कुलकर्णी, हितेश धांडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisement -