सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

भुसावळ ; – सहा वर्षीय बालिकेला केळी खावू घालण्याचे अमिष दाखवित तिच्यावर अत्याचार करणाऱ्या रोहनसिंग बिल्लरसिंग बारेला (वय २०, रा. जामुनझिरा ता. यावल) या नराधमाला दोषी ठरवित त्याला २० वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. हा निकाल भुसावळ विशेष न्यायालयाने दिला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील जामुनझिरा येथे सप्टेंबर २०२० रोजी सहा वर्षीय अल्पवयीन बालिकेला केळी खाण्यास देण्याचे अमिष दाखवित तिला घेवून जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रोहनसिंग बिल्लरसिंग बारेला याच्याविरुद्ध पोस्कोतंर्गत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला भुसावळ विशेष न्यायालयात चालविण्यात आला. यामध्ये सरकारपक्षाकडून अकरा साक्षीदार तपासण्यात आले. तसेच सरकारी वकील ॲड. मोहन देशपांडेयांनी प्रभावी युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरीत रोहनसिंग बारेला याला दोषी ठरविले. सरकारपक्षातर्फे सरकारी अभियोक्ता मोहन देशपांडे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून भिमदास हिरे यांनी तर केस वॉच म्हणून पीसी अनिल पाटील ऐजाज गवळी यांनी मदत केली. आरोपी रोशनसिंग बारेला याला २० वर्ष सक्तमजूरी व पाचशे रुपये दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, ही सर्व शिक्षा आरोपीला एकत्रित भोगावयाची असल्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS