back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

Deputy Chief Minister Mr. Devendraji Fadnavis ; उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमती स्मिताताई वाघ आणि खा रक्षाताई खडसे दाखल करणार उमेदवारी अर्ज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Deputy Chief Minister Mr. Devendraji Fadnavis जळगाव ( साक्षीदार न्युज ) : – भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मनसे रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), रासप, पीआरपी(कवाडे गट) प्रहार, लहूजी शक्ती सेना महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ तसेच रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार श्रीमती खा रक्षाताई खडसे ह्या उद्या गुरुवारी (ता.२५ एप्रिल) भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री ना गिरीशभाऊ महाजन, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या घटक पक्षांकडून यावेळी भव्य शक्तिप्रदर्शन देखील करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता भाजपा कार्यालय (जी.एम. फाउंडेशन) ते जिल्हाधिकारी कार्यालय, अशी भव्य पदयात्रा सुद्धा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात येईल.

- Advertisement -

दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजप प्रदेश अध्यक्ष मा आ चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस तसेच भाजपचे प्रदेश महामंत्री मा. विजय भाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शक्तिप्रदर्शनाला सूरवात होईल

हे देखील बघाल

महाविकास आघाडीची महारॅली

ठेकेदाराला मागितली १ पेटी रेकॉर्डिंग झाली व्हायरल

बापा पुढे बापाच्या जागी असलेला सासरा जिंकला…

या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जळगाव शहराचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे तसेच आमदार मंगेशदादा चव्हाण (महायुतीचे समन्वयक), संजय पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष व महायुतीचे समन्वयक) आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार एम.के. अण्णा पाटील, माजी खासदार ए.टी. नाना पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर (जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष भाजपा),अमोल हरिभाऊ जावळे (जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष भाजपा), सौ. उज्वलाताई बेंडाळे ( जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा भाजपा), नंदकिशोर महाजन (भाजपा रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख), डॉ.राधेश्याम चौधरी, (भाजपा जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख), निलेशभाऊ पाटील (जळगाव जिल्हाप्रमुख शिवसेना), मा. रावसाहेब पाटील (जळगाव जिल्हाध्यक्ष शिवसेना), वासुदेव पाटील (जळगाव जिल्हाध्यक्ष शिवसेना), मनसेचे नेते मा आ अॅड जयप्रकाश बाविस्कर अभिजित पानसरे मुंबई ,जमील देशपांडे (जिल्हाध्यक्ष मनसे), अभिषेक भाऊ पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगराध्यक्ष) सौ.मीनल ताई पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) सौ. सोनालीताई नारायण पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) सौ.सरिताताई माळी-कोल्हे (शिवसेना), गणेशभाऊ सोनवणे (शिवसेना), आनंदभाऊ खरात ( RPI आठवले गट), अनिल अडकमोल (आठवले RPI) राजूभाऊ मोरे (RPI कवाडे गट), दिनेश खरात (लहूजी सेना ), श्री.सुर्यवंशी (रासप) यांनी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.

Deputy Chief Minister Mr. Devendraji Fadnavis

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS