…म्हणून मी मनोज पाटलांना भेटायला आलो ; संभाजीराजे छत्रपती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ४ नोव्हेबर २०२३ | राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते तर गुरुवारी हे उपोषण काही अटीवर स्थगित करण्यात आले. सध्या मनोज पाटील छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. जरांगेंना भेटण्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे रुग्णालयात दाखल झाले होते.

- Advertisement -

संभाजीराजे म्हणाले की, पुढच्या लढ्यासाठी आणखी बळ यावं, यासाठी मी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. त्यांची रिकव्हरी चांगली असून लिव्हर आणि किडनीवरील सूज कमी झालेली आहे. तरीही लवकर डिस्चार्ज करण्याऐवजी जास्तीत जास्त दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. संभाजीराजे पुढे म्हणाले की, मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी गर्दी करु नये. हॉस्पिटलमध्ये शिस्त पाळण्यात यावी. गरीब मराठ्यांना न्याय मिळावा, हीच माझीदेखील भूमिका असते. मी २००७पासून समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. मनोज जरांगेंच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटणार आहेत याचा आनंद आहे.”समाजासाठी जे लढा देतात, अशांना बळ देण्यासाठी उभं राहाणं हे आपलं काम आहे. मनोज जरांगेंचा सरकारवर दबाव आहेच आणि आणखी दबाव वाढवण्यासाठी मी इथं आलो आहे.” अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS