back to top
रविवार, एप्रिल 20, 2025

Sanjay Sawant ;…तर यंदा यांना तडीपार करावेच लागेल-संजय सावंत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत याचे मतदारांना आवाहन

Sanjay Sawant जळगाव (साक्षीदार न्युज ): – भाजपाला महाराष्ट्राविषयी इतका द्वेष आहे की, त्यांनी महाराष्ट्रातील उद्योग, सेक्टर गुजरातला नेले. आपल्या जळगावमधील पाडळसे धरणाचे पाणी देखील त्यांनी गुजरातला, सुरतला घेऊन गेले. आणि हे पाणी जर का परत जळगावला आणायचं असेल तर आपल्याला यांना यंदा तडीपार करावेच लागेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले.

- Advertisement -

Sanjay Sawant

महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील-पवार यांच्या प्रचारार्थ रविवार, दि.५ रोजी जळगाव शहरातील जुने जळगाव प्रचार रॅली काढण्यात आली. त्यानंतर जोशी पेठेतील बागवान गल्ली येथे कॉर्नर सभा घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील, माजी महापौर जयश्री महाजन, ॲड. ललिता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंगला पाटील, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर, माजी नगरसेवक सुनील माळी, राजू मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, काँग्रेसचे महानगराध्यक्ष शाम तायडे, खालिद बागवान, माजी नगरसेविका पार्वताताई भिल, मनीषा पाटील, अरुणा पाटील, मीराताई सोनवणे, योगिता शुक्ल, मदन पाटील, समाधान महाजन, समाजवादी पार्टीचे रईस बागवान, मजहर पठाण, जितू बागडे, अयाज अली, सलीम इनामदार यांसह मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

संजयजी सावंत पुढे बोलतांना म्हणाले की, भाजपच्या पाय खालची वाळू सरकली आहे. त्यांना वाटत होत की, जळगावात फक्त भाजपचं चालतं, त्यामुळे या ठिकाणी कोणाचं काही चालणार नाही. मात्र, तुम्ही सर्वांनी त्यांचं धाडस तोडून टाकलं आहे. ते ज्या उंचीवर जाण्याचा प्रयत्न करीत होते, त्या उंचीवरून त्यांना खाली खेचलं आहे. त्यांनी आपल्यावर जो अन्याय केला आहे, त्या अन्यायाचा बदला घेण्याची वेळ १३ मे रोजी येणार आहे. त्या दिवशी नंबर १ वरील मशाल चिन्हा समोरील बटन दाबून करणदादा पाटील यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करायचे आहे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

*सभेत माजी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, सलीम इनामदार यांनी मनोगत व्यक्त करून १३ तारखेला जास्तीत जास्त संख्येने मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून करणदादा पाटील यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Sanjay Sawant

ठिकठिकाणी औक्षण आणि फुलांचा वर्षाव
सभेच्या सुरुवातीला करणदादा पाटील यांच्या प्रचारार्थ शहरातील जुने जळगाव भागात प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीला नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी करणदादा पाटील यांचे ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले. महिलांनीही ठिकठिकाणो औक्षण करून विजयासाठी भरभरून आशिर्वाद दिला. शहरातील तरुण कुढापा चौकातील श्री कृष्ण, सूर्यमुखी हनुमान आणि उमाळेश्वर महादेव मंदिरात पूजा करून विजयासाठी साकडे घालून रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विठ्ठल पेठ, बदाम गल्ली, मारोती पेठ, रामपेठ, रथचौक, बालाजी पेठ, शनिपेठ पोलीस स्टेशन चौक, भीलपुरा चौक, भवानी पेठ, इस्लामपूरा, सुभाष चौक, पोलन पेठ, राजकमल चौकमार्गे पुन्हा भवानी पेठ, जोशी पेठ आणि बागवान गल्ली. बागवान गल्ली येथे रॅलीचा समारोप करून रॅलीचे रूपांतर कॉर्नर सभेत करण्यात आले.

Sanjay Sawant

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Rohit Pawar | रोहित पवारांचं आवाहन: ‘फक्त ठाकरे नव्हे,...

 Rohit Pawar साक्षीदार न्युज । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच चर्चा सुरू आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील संभाव्य युतीच्या संकेतांनी राजकीय वातावरण...

Income Tax Return | आयकर रिटर्नसाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक;...

Income Tax Return साक्षीदार न्युज । नवीन आर्थिक वर्ष 2024-25 ची सुरुवात झाली असून, आता नोकरदार आणि इतर करदाते गेल्या आर्थिक वर्षातील आयकर विवरणपत्र...

UttarPradesh Mother Elopes With Daughters Father In Law |...

UttarPradesh Mother Elopes With Daughters Father In Law साक्षीदार न्युज । एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४३ वर्षीय महिलेने आपल्या मुलीच्या ४६...

RECENT NEWS