साक्षीदार | १८ नोव्हेबर २०२३ | देशात सर्वात मोठे राम मंदिराचे काम सुरु असतांना मध्यप्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मोफत राम मंदिर दर्शनाच्या ऑफरवर टीका होत असताना आता राज्याचे उद्योमंत्री उदय सामंत यांनी राम मंदिर दर्शनाबाबत वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील लोकांना राम मंदिर पाहायचं असेल तर त्याची व्यवस्था सरकार आणि शिवसेना करेल, हे आमचं देखील लोकांना वचन आहे, असे उदय सामंत म्हणाले.
उदय सामंत म्हणाले, राम मंदिर होत नव्हत आता राम मंदिर झालं. माझ्या मतदार संघातील लोकांना जर राम मंदिर बघायला जायचं असेल तर माझी जबाबदारी आहे. माझ्या मतदार संघातील सर्वसामान्य माणूस अयोध्येला जाऊ शकतो का? मी जर लोकप्रतिनिधी आहे आणि मी हे केलं तर पाप काय आहे? माझ्या मतदार संघापूर्ता मर्यादीत प्रश्न नाही. भविष्यात महाराष्ट्राच्या जनतेसाठी देखील एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राम मंदिराच्या बाबतीत निर्णय घेतील. मला वाटते राम मंदिर दाखवणं ही हिंदुस्थानची अस्मिता आहे. यामध्ये कमीपणा असण्याचं काम नाही. मी माझ्या मतदारसंघापासून सुरुवात करेल, असे उदय सामंत म्हणाले.