‘ ट्रान्सजेंडर ‘ व्यक्तींच्या प्रश्नांवर सामाजिक भान निर्माण व्हावे !बहिणाबाई विद्यापीठातील कार्यशाळेत मान्यवरांचा सूर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Transgender जळगाव (साक्षीदार न्युज ) :- ट्रांसजेंडर व्यक्तीकडे माणूस म्हणून बघण्याचे , त्यांच्या अस्तित्वाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे सामाजिक भान निर्माण करण्याची आज काळाची गरज आहे असा सुर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र विभागा तर्फे आयोजित कार्यशाळेत मान्यवरांनी व्यक्त केला .माध्यम प्रशाळा , नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स , मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट , नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ३० रोजी ‘ ट्रान्सजेंडर आणि सामाजिक भूमिका ‘ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली .

- Advertisement -

👉🏾 देशी गाय आता ” राज्यमाता, गौमाता ” म्हणून घोषित

प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ . एस. टी . इंगळे अध्यक्षस्थानी होते त्यांनी ट्रान्सजेंडर लोकांची संख्या जगात केवळ एक टक्का आहे त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडविणे ही सहज शक्य गोष्ट आहे , या लोकांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोण आजही सकारात्मक नाही , त्यांना आपण मानवतेच्या भूमिकेतून वागविले , त्यांच्या शिक्षण , आरोग्य , रोजगार यावर आपण लक्ष केंद्रित केले तर ते सामाजिक प्रवाहात येतील असे मत मांडले .उप जिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी सांगितले की ट्रान्सजेंडर समूह हा एकलकोंडे जीवन जगतो , त्यांच्या जवळ उत्पादनाचे साधन नसते , भिक मागून ते आपला उदर निर्वाह करतात मात्र आपल्या संविधानाने त्यानाही समानतेने जगण्याचा अधिकार प्रदान केला आहे . तेंव्हा समाजाने या लोकांचे प्रश्न मानवतेच्या भूमिकेतून समजून घेतले व त्यांना आपल्यात सामावून घेतले तर हा समाज मुख्य प्रवाहात येऊ शकतो .

साहित्यिक जयसिंग वाघ यांनी ट्रान्सजेंडर समूहाशी केवळ सहानुभूतीने वागून चालणार नाही तर त्यांना सामाजिक , शैक्षणिक व एकूणच राष्ट्रीय प्रवाहात आणण्याची गरज आहे , विद्यापीठ अश्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देवून , या विषयाचे साहित्य अभ्यासक्रमात लावून , अश्या विद्यार्थ्यांच्या साहित्यास प्रकाशित करण्या करिता पुढाकार घेवून या समूहास शैक्षणिक प्रवाहात आणु शकते . या समूहाची शैक्षणिक प्रगती झाली की इतर प्रश्न सहज सोडविता येतील , राजकीय पक्षांनी ट्रान्सजेंडर सेल काढून यांना राजकीय प्रवाहात आणावे असे विचार व्यक्त केले .प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते डॉ. भरत अमळकर यांनी संत साहित्यात , अध्यात्म शास्त्रात या लोकांना मर्यादे पलीकडे महत्व दिलेले नाही , या लोकांच्या संदर्भाने आजही अनेक गैरसमज आहेत असे मत मांडून नटराज हे ट्रान्सजेंडर होते मात्र रंगकर्मी आजही त्यांची पूजा करून त्यांचा सन्मान करतात हा आदर्श आपण घ्यावा असे आवाहन केले .

- Advertisement -

प्रसिध्द रंगकर्मी शंभू पाटील यांनी रामायण , महाभारत , पुरातन काळातील काही संदर्भ देत हे लोक त्या काळी कसे जीवन जगत होते याबद्दल माहिती दिली . ट्रान्सजेंडर ही समस्या नसून त्यांच्याकडं पाहण्याचा आपला दूषित दृष्टिकोण हीच खरी समस्या आहे असे सांगितले .
जेष्ठ समाजसेविका वासंती दिघे यांनी अश्या व्यक्तीची त्याच्या कुटुंबा कडूनच हत्या होते त्यामुळे यांना जगण्या करिता मोठा संघर्ष करावा लागतो , पुरुषसत्ताक समाज व्यवस्था व लिंग सापेक्ष प्रतिष्ठा देण्याची आपली मानसिकता यामुळे या लोकांचे प्रश्न अधिक वाढत आहेत असे विचार मांडले . समारोप परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ . योगेश पाटील यांच्या भाषणाने झाला . त्यांनी अश्या उपक्रमांत ट्रान्सजेंडर लोकांना बोलावून त्यांना बोलते केले , त्यांचे प्रश्न त्यांच्या कडून समजून घेतले तर सामाजिक दृष्टिकोण बदलविण्यास अधिक मदत होईल असे मत मांडले .

कार्यक्रमाच्या सुरवातीस सावित्रीबाई फुले , बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमांना सर्व मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले . दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.प्रास्ताविक संयोजक प्रा. डॉ. सुधीर भटकर , सूत्रसंचालन प्रा. डॉ. गोपी सोरडे यांनी तर आभार प्रदर्शन ऍड. सूर्यकांत देशमुख यांनी केले. अमोल पाटील , वैभव भोंबे , रंजना चौधरी , प्रल्हाद लोहार , मंगेश बाविसाने , पंकज शिंपी , धनंजय देशमुख यांनी परिश्रम घेतले . कार्यशाळेत विद्यार्थी , प्राध्यापक मोठ्यासंख्येने हजर होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS