Kha. Smitatai Vagh जळगाव (साक्षीदार न्युज ) ; – मानवाच्या कल्याणासाठी जैन विचाराची आज समाजाला गरज आहे. भगवान महाविरांची शिकवण आचरणात आणल्यास मानव जीवन सार्थक होते, त्यासाठी भगवान महावीरांची शिकवण आचरणात आणली पाहिजे असे आवाहन खा. स्मिताताई वाघ यांनी दिगंबर जैन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारप्रसंगी केले. यावेळी समाजाच्या संपर्क सूचीचे प्रकाशन व पर्युषण पर्व सांगता सोहळा आज ओक मंगल कार्यालयात संपन्न झाला. खा. स्मिताताई वाघ, आ.सुरेश (राजुमामा) भोळे, माजी महापौर जयश्री महाजन, जेष्ठ पत्रकार धन्यकुमार जैन, विश्वनाथ चतुर, रमेश खोबरकर, राजेंद्र काळे, निलेश पर्वतकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा रत्नमाला सैतवाल इ. मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दिगंबर जैन बहुद्देशीय मंडळातर्फे आयोजित या सत्कार सोहळ्यात 41 गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना खा. स्मिताताई वाघ यांनी जैन समाजाचा चातुर्मास आणि पर्युषण पर्वातील उपवास याची महती विषद केली. मानवाच्या कल्याणासाठी जैन विचाराची आज समाजाला गरज आहे. भगवान महाविरांची शिकवण आचरणात आणल्यास जीवन सार्थक होते. जैन मैत्रिणीच्या सहवासात असल्यामुळे पर्युषण पर्वातील काही दिवस उपवास केले आहेत. प्रसन्न जीवन कसे असते याचा अनुभव मी स्वतः या उपवासातून घेतला आहे. यावेळी बोलताना आ. सुरेश (राजुमामा) भोळे यांनी विद्यार्थ्यांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जास्तीत लाभ घेऊन शिक्षण क्षेत्रात गरुडझेप घ्यावी असे आवाहन केले. तर माजी महापौर जयश्री महाजन यांनी विद्यार्थिनींनी उच्च शिक्षण घेऊन आत्मनिर्भर व्हावे आणि स्वतः सोबतच समाजाला सशक्त करावे असे आवाहन केले. यावेळी जळगाव तालुक्यातील दिगंबर जैन समाजाच्या संपर्क सूचीचे प्रकाशन करण्यात आले. या सुचिमध्ये मोबाईल नंबरसह जैन आरती संग्रह, देशभरातील जैन तीर्थक्षेत्राचे संपर्क नंबरही देण्यात आले आहेत.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश डेरेकर, दीपक जैन, महावीर सैतवाल, देवेंद्र डेरेकर, योगेश काळे, सागर जैन, सुनील अपकाळे, पवन जैन अजय सूर्यवंशी, अनिल अपकाळे, राजेंद्र सुलाखे, महिला मंडळाच्या सुवर्णा जैन, कविता सैतवाल, ज्योती सूर्यवंशी, संगीता सैतवाल, नयना भागवतकार, सीमा डेरेकर, रुपाली खोबरकर, मंगला जैन, वर्षा जैन, आरती डेरेकर, लक्ष्मी चतुर इ. परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन संतोष जैन तर आभार दीपक फुलमोगरे यांनी व्यक्त केले.