साक्षीदार | २२ नोव्हेबर २०२३ | राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरे सुरु असतांना आता त्यांनी नाशिकमध्ये आल्यावर मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, दुसऱ्याचं खाऊन बसणाऱ्यांना काय बोलणार, असे छगन भुजबळ यांचे नाव न घेता नाशिकमध्ये त्यांच्यावर टीकास्त्र डागले असून फक्त मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी लढतो आहे. मला जनता पाहिजे, सत्तेची हाव नाही. मराठा समाजाचे आरक्षण अंतिम टप्प्यात असून काहींचे हिशोब चुकते करायचे असल्याचा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मराठा नेत्यांनी साथ दिली असती तर मराठा समाजाला 2 तासात आरक्षण मिळाले असते. परंतु ही मराठा समाजाची शोकांतिका आहे, अशी खंत मनोज जरांगे पाटील यांनी आज व्यक्त केली. मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद काही संपता संपत नसल्याचे चित्र आहे.