विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यंदा कोणता संघ चॅम्पियन होणार आहे, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. पण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कोणता संघ चॅम्पियन होईल याचे भाकीत माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुलीने केले आहे. माध्यमांशी बोलतांना सौरव गांगुली यांनी सांगितले कि, “भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. भारताने आतापर्यंत जबरदस्त खेळ केला आहे. अजून एक सामना बाकी आहे. विश्वचषक फायनल ही फायनलसारखी असते.
टीम इंडियाचे खूप खूप अभिनंदन. फायनल ज्या पद्धतीने खेळली जात आहे, तशी खेळली तर टीम इंडियाला रोखणे कठीण होईल. ही खूप चांगली टीम आहे.” भारतीय संघाने हा सामना जिंकल्यास ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाची बरोबरी होईल. वास्तविक, ऑस्ट्रेलिया हा असा संघ आहे ज्याने वर्ल्ड कपमध्ये दोनदा ११-११ सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 10 सामने जिंकले आहेत. जर तिने अंतिम सामना जिंकला तर सलग 11 सामने जिंकण्याचा ऑस्ट्रेलियाचा विक्रम ती मोडेल. भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात आहे टीम इंडियाचे खेळाडू यंदा चमकदार कामगिरी करत आहेत. टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर ते बॉलिंगपर्यंत सर्व 11 खेळाडू फॉर्मात आहेत. शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर फलंदाजीत सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. गोलंदाजीत मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज हे अव्वल फॉर्मात आहे.