back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

Special Train Summer Vacation | उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ‘या’ जिल्ह्यासाठी तब्बल 356 विशेष रेल्वे; 25 मार्चपासून करा बुकींग सुरु

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Special Train Summer Vacation साक्षीदार न्युज । उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची नियमित रेल्वेसह उन्हाळी विशेष रेल्वे चालवणार आहे. त्याचबरोबर नांदेडला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून रेल्वे धावणार आहेत. या रेल्वेच्या 24 अतिरिक्त फेऱ्या होतील. त्यामुळे मध्य रेल्वेने चालवलेल्या उन्हाळी विशेष रेल्वेंची एकूण संख्या आता 356 झाली आहे.

- Advertisement -

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून हुजूर साहेब नांदेड ही विशेष रेल्वे धावणार आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून ही रेल्वे सुरू होणार असून जून अखेरीपर्यंत ही रेल्वे धावणार आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 101105 ही साप्ताहिक विशेष रेल्वे 9 एप्रिल 2025 ते 25 जून 2025 पर्यंत दर बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 12.55 वाजता सुटेल आणि नांदेड येथे त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01106 ही साप्ताहिक विशेष रेल्वे 9 एप्रिल 2025 ते 25 जून 2025 पर्यंत दर बुधवारी नांदेड येथून रात्री 8 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 2.45 वाजता पोहोचेल. या रेल्वेला एक प्रथम वातानुकूलित डबा, एक द्वितीय वातानुकूलित डबा, 5 तृतीय वातानुकूलित डबे, 8 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी डबे, 1 सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्डस ब्रेक व्हॅन, 1 जनरेशन व्हॅन आणि 1 पॅन्ट्री असेल.

- Advertisement -

या रेल्वेला ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, लातूर, परळी, गंगाखेड, परभणी आणि पूर्णा येथे थांबा असेल. गाडीचे आरक्षण विशेष शुल्कासह 25 मार्च रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होईल. तसेच अनारक्षित डब्यासाठीचे तिकीट अतिजलद मेल, एक्स्प्रेससाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कासह यूटीएसद्वारे आरक्षित करता येतील.

नांदेड येथे दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय कार्यालय रेल विकास भवन चैतन्य नगर नांदेड येथे आहे. हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे विभागात आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, छत्रपती संभाजीनगर, बंगळूर, चेन्नई, चंदिगढ, जयपूर, बनारस, अलाहाबाद, विशाखापट्टणम, श्री गंगानगर, ओरिसा, हावडा, तिरुपती, कोल्हापूर, पटना, नागपूर येथून नांदेडसाठी थेट रेल्वेसेवा आहे. शीख भाविकांसाठी नांदेड ते अमृतसर अशी गाडी चालविण्यात येते.

Special Train Summer Vacation

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS