भरधाव ट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज ; – भुसावळ शहरातील मुन्ना तेली पेट्रोल पंपाजवळ भरधाव ट्रकच्या धरकेत दुचाकी वरील दोन जण ठार झाल्याची घटना गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र सवजी राठोड वय-३८ रा. सुभाषवाडी ता.जळगाव आणि प्रकाश उखा तवर वय-४५ रा. डोहरी तांडा ता. जामनेर असे मयत झालेल्या व्यक्तींची नावे आहे.

- Advertisement -

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरात नजीकच्या मुन्ना तेली पेट्रोल पंपाजवळ दुचाकीस्वार जितेंद्र राठोड आणि प्रकाश तवर हे त्यांची दुचाकी (एमएच १९ टीएन ६०९) वरून गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळकडे येत होते. त्यावेळी मागून भरधाव वेगाने येणारा ट्रक (आरजे ११ जीए ९९०३) जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील जितेंद्र राठोड आणि प्रकाश तवर यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेप्रकरणी रात्री ११ वाजता ट्रकवरील अज्ञात चालका विरोधात भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र पाटील हे करीत आहे.

Truck Crushed

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS