back to top
शनिवार, सप्टेंबर 27, 2025

Oxford English Medium School; ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा सप्ताहाचे यशस्वी आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चोपडा ; – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील, प्रा. डॉ. क्रांती क्षीरसागर, शाळा समन्वयक प्रा. डी. एस. पाटील आणि शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या आणि हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. गॅसच्या फुग्यांचा वापर करून आकाशात उंचावर शाळेच्या क्रीडा फलकाचे प्रक्षेपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षिका क्रांती क्षीरसागर आणि शाळा समन्वयक प्रा. डी. एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

- Advertisement -

Oxford English Medium School ; शाळेतील पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी आणि इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले. या खेळांमध्ये पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी झिगझॅक रेस, जिलेबी रेस, बकेट बॉल रेस, रनिंग, फ्रॉग जंप पुस्तकाचा समतोल राखत धावणे अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी पन्नास मीटर धावणे, लिंबू चमचा, फुगे फोडणे, चेंडू बादलीत टाकणे, पुस्तकाचा समतोल राखत धावणे इत्यादी खेळांचा समावेश केलेला आहे. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शंभर मीटर धावणे, दोनशे मीटर धावणे आणि चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धा तसेच लिंबू चमचा, बलून रेस, तीन पायांची शर्यत आणि गोळा फेक यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले आहे. सांघिक खेळांमध्ये क्रिकेट, थ्रो बॉल आणि बॅडमिंटन इ. खेळांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांसाठीही विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध क्रीडा प्रकारांसाठी विद्यार्थ्यांना शाळेचे उपमुख्याध्यापक अमन पटेल, क्रीडा शिक्षिका पूजा चौधरी आणि क्रीडा शिक्षक भूषण गुजर यांचे मार्गदर्शन लाभले. क्रीडा सप्ताहाच्या अनुषंगाने शाळेतील कलाशिक्षक देवेन बारी यांनी आकर्षक फलक रेखाटन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील क्रीडा शिक्षिका पूजा चौधरी आणि अश्विनी ढबू यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका धनश्री पवार यांनी केले. क्रीडा स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Oxford English Medium School

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Heavy Rain | “मुसळधार पावसाने घेतले 84 जीव! मृतांच्या...

Heavy Rain | साक्षीदार न्यूज | राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर मानवहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे....

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

RECENT NEWS