Sri Sri 1008 Mahamandaleshwar Swami Shantigiriji Maharaj ; अध्यात्म शिरोमणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे आज यावल तालुक्यात आगमन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावल ( साक्षीदार न्युज ) ; – श्रीक्षेत्र वेरूळ ता. रत्नपुर ( खुलताबाद)जि. छत्रपती संभाजी नगर येथील जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी )महाराज यांच्या 34 व्या पुण्यस्मरणार्थ श्रीक्षेत्र नासिक तपोवन कुंभमेळा मैदान या ठिकाणी दिनांक 17 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2023 पासून सुरू होणाऱ्या जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा या कार्यक्रमाच्या भक्त फेरी निमित्त जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री.श्री.1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचे आज दिनांक 18 नोव्हेंबर 2023 शनिवार रोजी संध्याकाळी ठीक 5. वाजता यावल तालुक्यातील सांगवी खुर्द (माय सांगवी) येथे आगमन होणार आहे

- Advertisement -

संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांची सांगवी खुर्द गावातून पालखी मिरवणूक होणार असून त्यानंतर 6 ते 9 वाजेपर्यंत नित्यनेम विधी आरती त्यानंतर परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचे प्रवचन होणार असून व तेथून स्वामी शांतिगिरी महाराजांचे रात्री 10 वाजता यावल येथील श्री व्यास मंदिराकडे प्रस्थान होणार असून तेथे महाराजांचा मुक्काम असणार आहे व सकाळी दिनांक 19/ 11 /2023 वार रविवार रोजी यावल येथील श्री व्यास व श्रीराम मंदिर मंगल कार्यालय येथे सकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत परमपूज्य जनार्दन स्वामींची नित्यनेम विधी आरती व परमपूज्य स्वामी शांतिगिरी महाराज यांचे प्रवचन येणार आहे. त्यानंतर महाराजांचे पुढील कार्यक्रमाकडे प्रस्थान होणार आहे.

तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी परमपूज्य स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रवचनाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त जय बाबाजी भक्त परिवार यावल तालुका तर्फे करण्यात आले आहे

Sri Sri 1008 Mahamandaleshwar Swami Shantigiriji Maharaj

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS