एसटीची भाडेवाढ  ; उमरगा बस स्थानकासमोर शिवसेना उबाटा गटाच्या वतीने एक तास चक्काजाम आंदोलन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

उमरगा । साक्षीदार न्युज । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या एसटी बसची भाडेवाढ ही सर्वसामान्य जनतेसाठी अन्यायकारक असून ,भाडेवाढ मागे घ्यावे या मागणीसाठी आमदार प्रवीण स्वामी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मुख्य बसस्थानका समोर दि.27 रोजी सकाळी 11 वाजण्याच्यासुमारास शिवसेना उबाटा गटाच्या वतीने एक तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

एसटीने 15% दरवाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय महामार्गावर 27 जानेवारी रोजी सकाळी एक तास शिवसेना उबा ता गटाच्या वतीने चक्काजाम आंदोलन केले यावेळी राष्ट्रीय महामार्ग वाहतूक बंद होती. एसटी वाहतूक ही बंद होती यावेळी आमदार प्रवीण स्वामी म्हणाले की एसटी भाडे वाढ ही जनतेवरील अन्यायकारक आहे. सर्वसामान्य जनतेसाठी ही भाडे न परवडणारी आहे. लाडकी बहीण योजना व ईव्हीएम घोटाळ्यामुळे हे सरकार सत्तेवर आले आहे. हा लाडक्या बहिणीवर अन्याय झाला आहे. अनेक एसटी खिळखिळ्या आहेत कसलेही सुधारणा नसताना हे भाडेवाढ सर्वसामान्य जनतेसाठी चुकीची आहे‌. विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार एसटी सोडण्यात येईल सहलीसाठी चांगल्या बसेस सोडण्यात यावे. एसटी कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यांनी अन्याय करू नये व अगोदरच त्रस्त असलेल्या जनतेवर लादलेली ही भाडे रद्द करावी अन्यथा उमरगा बस स्थानकासमोर पुन्हा आमरण उपोषण करू असा इशारा आमदार स्वामी यांनी यावेळी दिला यावेळी आगारप्रमुख कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी रज्जाक अत्तर , रणधीर पवार ,बसवराज वरनाळे, सुधाकर पाटील ,भगवान जाधव ,आप्पाराव गायकवाड ,सदाशिव भातागळीकर ,मारुती थोरे, विजयकुमार नागदे, शिवाजी गायकवाड ,दत्ता शिंदे,विजयकुमार तळबोगे महेश शिंदे वैजनाथ काळे,प्रेमनाथ शहापुरे,महेश पाटील,शिवाजी कोकळे,महादेव काळे,वैशाली जाधव,हणमंत सुरवसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

- Advertisement -

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

RECENT NEWS