Khandwa Burhanpur Raver instead of Bhusawal भुसावळ (साक्षीदार न्युज) ; – येथून पुणे साठी रेल्वे गाडी सुरू होण्याच्या प्रस्ताव सादर झाला असून त्यात सुधारणा करून पूर्वी प्रमाणे रावेर मार्गे बुऱ्हाणपूर खंडवा मार्गे करावा अशी अपेक्षा महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्य मधील प्रवाशी चळवळी साठी सतत कार्यरत असणारे लढावू नेते श्री प्रशांत बोरकर प्रदेश अध्यक्ष भारतीय किसान संघटन महाराष्ट्र यांनी केली आहे
👉🏽 Orion English Medium State Board शाळेच्या विरुद्ध शिक्षकाचे आमरण उपोषण
बुऱ्हाणपूर रावेर परिसरात अनेक वर्षापासून पुणे मुंबई कडे जाणाऱ्या प्रवासी संख्या रोज हजारो ने असून त्याबाबत योग्य त्या रेल्वे गाड्या सुरू कराव्यात यासाठी रेल्वे प्रवासी नेते राष्ट्रीय जनता दलाचे भारतीय किसान संघटन चे प्रदेश नेते श्री प्रशांत बोरकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत असून रावेर रेल्वे स्टेशन भुसावळ DRM मॅडम मॅनेजर महाप्रबंधक कार्यालयापासून महामहीम राष्ट्र पती महोदय मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन देवून मागण्या केल्या आहेत
त्यात भुसावळ हून सुरू असलेली चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी बंद केलेली हुतात्मा एक्सप्रेस बंद केल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत होती
रावेर लोकसभा मतदारसंघ असला वरही त्यात भुसावळ विभाग रावेर लोकसभा मतदारसंघ मधे येत असल्याने रावेर मतदार संघाचे रावेर शहरास दुय्यम वागणूक दिली जात आहे
त्याबाबत मोठ्या मनाने त्या गाड्या खंडवा बुऱ्हाणपूर हून रावेर मार्गे पुणे मुंबई साठी सोडाव्या अशी मागणी लाखो प्रवाशी तर्फे गेल्या अनेक वर्षांपासून श्री प्रशांत बोरकर आणि त्याचे मित्र मंडळ संघटना करत आहेत काही महिने पूर्वी मध्य रेल्वे चे महाप्रबंधक यादव साहेब यांची तसेच भुसावळ येथे विविध अधिकारी यांची भेट घेवून श्री प्रशांत बोरकर. संजय दीक्षित बुऱ्हाणपूर रावेर चे संजय चौधरी ऍड महेश चौधरी ऍड स्वानील सोनारदीपक भालेराव रमेश पाटील असगर अली महेश तायडे सुभाष अकोले वसंत महाजन रामकृष्ण चोधरी यांनी तसेच त्यांचे भारतीय किसान संघटन प्रवाशी संघटना शेकडो कार्यकर्ते यांनी वेळोवेळी मागणी केली आहे आणि मागण्याचे महत्त्व पटवून दिले आहे. श्री प्रशांत बोरकर यांचे टीम चे महाराष्ट्र सह मध्य प्रदेश मधे प्रवाशी संघटना संपर्कात असल्याचे दिसून आले असून त्याचे पाठपुरावा सुरू असतो.