back to top
शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025

Swami Vivekananda; स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा.

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव: – येथील के.सी.ई. सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात पहिला राज्य क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम १९५२ मध्ये हेलसिंकी येथे पार पडलेल्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक कांस्यपदक मिळवून देणाऱ्या महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस उपप्राचार्य श्रीमती करुणा सपकाळे यांच्या शुभहस्ते माल्यार्पण करण्यात आले.

- Advertisement -

याप्रसंगी मरणोत्तर अर्जुन पुरस्कार प्राप्त खाशाबा जाधव यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देत भारतीय क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व योगदानाबद्दल व एकंदरीतच त्यांच्या क्रीडा प्रवासाबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ.रणजीत पाटील यांनी अवगत करून विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन अधिकाधिक पदके प्राप्त करून कॉलेजच्या पर्यायाने राज्याच्या आणि देशाच्या क्रीडा वैभवात मौलिक भर घालण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी सॉफ्टबॉल स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर महाविद्यालयाचे, देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या वैभव बारी या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच शालेय राज्यस्तरावर मुलींच्या सॉफ्टबॉल स्पर्धेतील विजयी तसेच डॉजबॉल स्पर्धेतील उपविजयी संघातील विद्यार्थिनी, २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाच्यावतीने बॉल बॅडमिंटन,बॅडमिंटन, बॉक्सिंग यासारख्या विविध क्रीडा प्रकारात जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या व पदके प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रा. करुणा सपकाळे (उपप्राचार्य) प्रा.आर.बी.ठाकरे (पर्यवेक्षक), विज्ञान शाखा समन्वयिका प्रा.स्वाती बऱ्हाटे, कला व वाणिज्य शाखा समन्वयक प्रा उमेश पाटील, जिमखाना समिती चेअरमन प्रा.शिल्पा सरोदे, जिमखाना समिती सदस्य डॉ.अतुल इंगळे व प्रा. वर्षा पाटील, क्रीडा शिक्षक डॉ.रणजीत पाटील यांच्या शुभहस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रणजीत पाटील यांनी तर आभार प्रदर्शन जिमखाना समिती सदस्य प्रा.संदीप वानखेडे यांनी केले. के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत श्री.नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे यांनी सर्व गुणवंत खेळाडूंचे कौतुक करत राज्य क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Swami Vivekananda

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Fadnavis Support Pawar, Thackeray | फडणवीसांचा पवार-ठाकरेंना फोन, राजकीय...

Fadnavis Support Pawar, Thackeray | साक्षीदार न्यूज | जगदीप धनकड यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी...

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

RECENT NEWS