मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन.

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

तहसीलदार गोविंद येरमे यांच्याकडे निवेदनाद्वारे कार्यकाळ वाढवून देण्याची मागणी.

- Advertisement -

उमरगा (साक्षीदार न्युज) ; – तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेतील सहाय्यक प्रशिक्षणार्थी यांनी एकत्र येत संघटने तर्फे निवेदन देऊन कार्यकाळ वाढून भेटावा यासाठी तहसीलदार गोविंद येरमे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तहसीलदार गोविंद येरमे यांना दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की, आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहोत. आणि आम्ही प्रशिक्षण हे पूर्ण जिद्दीने आणि चिकाटिने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु आम्ही या सहा महिन्यानंतर करणार काय ?, आम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळावा यासाठी आम्हाला आमचा कार्यकाळ वाढून देण्यात यावा. सहाय्यक प्रशिक्षणार्थी यांना रोजगार प्राप्त होईल. आम्ही ग्रामीण व शहरी भागातील प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत असताना आम्ही त्या आस्थापना मधील कामाचा संपूर्ण पणे अनुभव घेत आहोत. आणि आम्ही सतत पुढे काम करत रहावे आशी आमची विनंती सरकार व प्रशासनाकडे आहे .आमचा अनुभव पूर्ण होण्यासाठी आमचा कार्यकाळ हा शासनाने व सरकारने वाढवावा अशी विनंती त्या निवेदना मध्ये केली आहे.

सर्व आस्थापना मधील सहाय्यक प्रशिक्षणार्थी यांचे विद्यावेतन देण्यात यावे, काही आस्थापना मधील प्रशिक्षणार्थी यांचे विद्यावेतन मिळाले नाही तरी प्रशासनाने लक्ष देवून महिन्या अखेर १ ते ७ तारीख मध्ये विद्यावेतन देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी अध्यक्ष चेतन गायकवाड , उपाध्यक्ष नितीन जाधव, सचिव अनिकेत औरादे, संपर्क प्रमुख सुरज आबाचने, महिला आघाडीच्या अध्यक्षा सोनाली वरवठे , उपाध्यक्षा राजश्री एकेळे, सचिव अर्चना मम्माळे, आणि उमरगा तालुक्यातील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS