जळगावात मध्यरात्री चारचाकीवर दगडफेक ; ७ जणाविरोधात गुन्हा दाखल !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २४ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील पिंप्राळा येथील पाटीलवाडा परिसरात मध्यरात्री चारचाकी वाहनावर दगडफेक करून नुकसान केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील पाटील वाडा बापू ओंकार महाजन (४५) यांनी १९ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांची मालवाहू चारचाकी वाहन (क्र. एमएच १९ सीवाय ४४८७) घराच्या समोर मोकळ्या जागेत उभे केले होते. मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी वाहनावर दगडफेक करून मोठे नुकसान केले. हा प्रकार २० ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी महाजन यांनी रविवार, २२ ऑक्टोबर रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक विनोद सूर्यवंशी करीत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS